शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मानसिक छळ झालेल्या वयोवृद्धांच्या चौकशीस प्रारंभ

By admin | Updated: June 14, 2016 00:07 IST

ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी येथून स्थानांतरित झालेले सहदुय्यम निबंधकांच्या व ...

दोघांचे जबाब मागविले : सहदुय्यम निबंधकांची तक्रारअचलपूर : ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी येथून स्थानांतरित झालेले सहदुय्यम निबंधकांच्या व एका मुद्रांक विके्रत्यांच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदारांना दिले आहेत. त्यांनी सहदुय्यम निबंधकांना व ज्येष्ठ नागरिकांना नोटीस बजावून दोघांचे म्हणणे काय आहे, याचे स्पष्टीकरण मागितले आहे.येथील वयोवृद्ध नागरिक काशिनाथ तिडके (८८) यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदारांनी ७ डिसेंबर २०१५ रोजी सहनिबंधकांना पथ्रोट येथील गट नंबर १६१२ क्षेत्रफळ तिडके यांच्या नावाने करून देण्यास कळविले. त्यानुसार १५ डिसेंबर २०१५ रोजी सहदुय्यम निबंधकांच्या कार्यालयात गेलो असता त्यांनी जिरायती व तुकडा जमीन असल्यामुळे खरेदी होत नाही, असे सांगून तहसीलदारांना विचारून कळवितो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी ते तेथे गेले असता तेच उत्तर दिले. त्यामुळे तिडके या वयोवृध्दाने तहसीलदार मनोज लोणारकर यांची भेट घेतली. त्यांनी निबंधकांना खरेदी करून देण्यास सांगितले. मात्र सह दुय्यम निबंधक अर्जुन बडधे यांनी एजंट सदूमार्फत पैशाची मागणी केली. वृद्धाने पैसे देण्यास ठाम नकार दिला. नंतर बडधे यांनी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी वृद्धाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून धमकावले होते. याची तक्रार अचलपूर येथील पोलीस स्टेशनला तिडके यांनी देऊन बडधे यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली होती.हा तक्रारीचा अर्ज ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार तपास अधिकारी मतीन शेख यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्याकडे वर्ग केला होता. त्यानुसार चौकशीला प्रारंभ झाला आहे. (शहर प्रतिनिधी)