शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

रूपेरी पडद्यावरील स्टार झाली खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:19 IST

दाक्षिणात्य चित्रपटात यशस्वी कारकीर्द करणाऱ्या नवनीत राणा यांची खासदारकीपर्यंतची वाटचाल आव्हानात्मक व महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

ठळक मुद्देनवनीत राणा यांचा राजकीय प्रवास : रवि राणा यांची समर्थ साथ

लोकमत न्यूज नेटवर्कदाक्षिणात्य चित्रपटात यशस्वी कारकीर्द करणाऱ्या नवनीत राणा यांची खासदारकीपर्यंतची वाटचाल आव्हानात्मक व महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.दहा वर्षांपासून आमदार असलेले रवि राणा हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जडणघडणीतून नवनीत यांचे सामाजिक व्यक्तिमत्त्व फुलले. जनसामान्यांच्या व्यथेशी राणा दाम्पत्याची नाळ जुळलेली आहे. घरात त्यामुळेच जनसामान्यांचा सदान्कदा वावर. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होणाºया नवनीत यांच्या राजकीय जडणघडणीची सुरूवात समाजजाणिवेतून झाली आहे.आमदार रवि राणांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभागी होणाºया नवनीत यांनी सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचे चार टर्म खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांना ‘मोदी लाट’ व प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या अमरावती येथील प्रचार सभेनंतरही कडवी झुंज दिली. त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. मात्र, या निवडणुकीतून त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला विशिष्ट आकार आला. मोदी लाटेत दखलनीय मते त्यांनी खेचली. हरल्या; पण अपयशाने न डगमतता त्यांनी पाच वर्षे सातत्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक लहान-मोठ्या गावाला भेटी दिल्यात. मेळघाटसारखा दुर्गम आदिवासी भाग त्यांनी पिंजून काढला. आदिवासींच्या समस्यांसाठी त्या लढल्या. कायम संपर्क ठेवला. स्वच्छ मनाच्या आदिवासींना नवनीत राणा आणि रवि राणा यांचे व्यक्तिमत्त्व भावले. आदिवासींनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. हे प्रेम भेटीपुरते नव्हते; ते मतदानात परिवर्तित झाले. दोन्ही निवडणुकांत नवनीत राणा यांना आदिवासींनी भरभरून मतदान केले. नवनीत यांच्यातील स्पार्क शरद पवार यांनी ओळखला होता. त्याचमुळे त्यांच्यावर पवारांनी विश्वास टाकला. देशभरात मोदी लाट असताना राज्यात केवळ अमरावतीत अपक्ष उमेदवार असलेल्या नवनीत राणा निवडून आल्या आहेत. ही केवळ पायरी होय, असे सांगणाºया नवनीत यांचा राजकीय आलेख सातत्याने वाढतच जाणार आहे, हे वेगळे सांगणे नको.उभयता बाबा रामदेव यांचे अनुयायीआमदार रवि राणा व नवनीत राणा हे दोघेही योगगुरू बाबा रामदेव यांचे अनुयायी आहेत. मुंबई येथील योग अध्यात्म शिबिरात त्यांची प्रथम भेट झाली. मैत्री होऊन कालांतराने त्यांनी विवाह केला. त्यानंतर नवनीत यांचा आमदार रवि राणा यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग सुरू झाला.विश्वविक्रमी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नअमरावती शहरातील सायन्स कोअर मैदानावर योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वविक्रमी ३७२० जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात बडनेरा मतदारसंघातील आमदार रवि राणा यांच्याशी लग्न ही त्यांची सामाजिक जाणिवेची सुरूवात ठरली. या सोहळ्यात २४४३ हिंदू, ७३९ बौद्ध, १५० मुस्लीम, १५ ख्रिस्ती, १३ अंध व ३६० पारधी जोडपी सहभागी होती. नापिकी व दुष्काळामुळे उपवर मुला-मुलींच्या लग्नासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, ही त्यामागची संकल्पना. या सामूहिक विवाह सोहळ्याची नोंद गिनिज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व लिम्का बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठा विवाह सोहळा अशी करण्यात आली. जनसामान्याच्या सुख-दु:खात सहभाग होण्यास सुरूवात झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालamravati-pcअमरावती