शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

टायरअभावी १०८ रुग्णवाहिका उभ्या

By admin | Updated: July 24, 2016 00:16 IST

पावसाळ्यामध्ये मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा आदेश कागदावरच थांबला असून....

डॉक्टरांची पदे रिक्त : मेळघाटची आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटीलेटरवर’नरेंद्र जावरे परतवाडापावसाळ्यामध्ये मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा आदेश कागदावरच थांबला असून रिक्त डॉक्टरांची पदे, १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेसह प्राथमिक आरोग्य केंद्राची वाहने टायरअभावी दोन महिन्यांपासून उभ्या असताना डिझेलसाठीसुद्धा ताटकळावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी रुग्णांना जीवनदान देणारी आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर शेवटच्या घटका मोजत असल्याचे संतापजनक चित्र आहे.चिखलदरा तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, ४० उपकेंद्र, तीन पी.एच.यू. केंद्र, दहा भरारी पथके, दोन ग्रामीण रुग्णालयांवर दीड लाखांवर नागरिकांच्या आरोग्याची मदार आहे. सलोना, काटकुंभ, टेंब्रुसोंडा, सेमाडोह आणि हतरु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समाविष्ट गावांची संख्या आरोग्य विभागालाच ताप आणणारी ठरली आहे. शंभर कि.मी. पर्यंत ये-जा करण्यासाठी रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत असल्याचे वास्तव आहे. या दिवसात किमान चार महिने मेळघाटात बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश वारंवार न्यायालयाने दिल्यावर काटकुंभ, हतरू, टेंब्रुसोंडासह पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांत गट ‘अ’ श्रेणीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. बारुगव्हाण व पाचडोंगरी येथील भरारी पथक दीड महिन्यापासून डॉक्टरअभावी बंद आहे. येथील दोन्ही महिला डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. मात्र पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही, हे विशेष.टायरअभावी वाहने उभीमेळघाटातील आरोग्य यंत्रणा या ना त्या कारणाने सतत वादग्रस्त ठरत असल्याचे वास्तव आहे. मुंबईपासून मेळघाटात लक्ष ठेवले जात असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र सर्वाधिक समस्यांच्या विळख्यात आरोग्य यंत्रणा सापडली आहे. महिनाभरापासून चुरणी येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला टायर नाही. परिणामी रुग्णवाहिका उभी आहे. अती जलद सेवा म्हणून राज्य शासनातर्फे उपलब्ध करून दिल्यानंतरही देखभालीसाठी निधीच दिला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनांनासुद्धा टायर नसल्याने उभी असल्याचे चित्र काटकुंभ, सेमाडोह, हतरु प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. गंभीर रुग्णांना रेफर केल्यास दुसरी कुठलीच व्यवस्था नाही.नवसंजीवनीच्या बैठकीचा फार्समेळघाटातील कुपोषणाचा गाजावाजा जगभर झाल्यानंतर विविध योजनांचे पीक येथे आले. त्यानंतरही आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ता, बसगाडी या सर्व मुलभूत गरजांसाठी आदिवासींना आंदोलनच करावे लागत आहे. ‘नवसंजीवनी’ बैठकीत या योजनांचा आढावा घेण्यात येतो. बैठक संपताच सर्व काही आॅलवेल असल्याचे चित्र आहे.टायरअभावी रुग्णवाहिका उभी असून, रिक्त पदांवर वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.- सतीश प्रधान,तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा