शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

अवेळी पाणी; झोपेचे खोबरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त भासत आहे. मात्र, त्यासाठी अनियमित वेळेचा बोजा सहन करायचा का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. रात्री १२ वाजता नळ सोडताना कुणाला गृहीत धरले जाते, हे अद्याप कोड्यात आहे. काही ठिकाणी दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित केला जात नसल्याने लोकांची प्रचंड नाराजी आहे.

मनीष तसरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची तहान भागविणारा एकमेव तलाव म्हणजे माेर्शी येथील अप्पर वर्धा धरण होय. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने नलदमयंती तलाव हा शंभर टक्के पूर्ण भरला होता. सद्यस्थितीत धरणात पन्नास टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी शहराची तहान भागविण्याकरिता पुरेसे असले तरी अपुरा पुरवठा, अनियोजित वेळी येणारे नळ यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता विचका झाल्याचा अनुभव अमरावतीकरांना येत आहे. अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त भासत आहे. मात्र, त्यासाठी अनियमित वेळेचा बोजा सहन करायचा का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. रात्री १२ वाजता नळ सोडताना कुणाला गृहीत धरले जाते, हे अद्याप कोड्यात आहे. काही ठिकाणी दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित केला जात नसल्याने लोकांची प्रचंड नाराजी आहे. पूर्ण एक तासही नळाला पाणी येत नसल्याची शहरातील महावीरनगर, नृसिंह कॉलनी, मच्छगंधा कॉलनी, सामरानगर येथे ओरड आहे. बडनेरा येथील आठवडी बाजार, अशोकनगर, राहुलनगर, नवी वस्ती बडनेरा या लोकवस्तीत पिण्याचे पाणी कमी दाबाने मिळते. 

२०३३ मधील नियोजन आताचअमरावती ही ‘ड’ वर्ग महानगरपालिका असून, सध्याची लोकसंख्या ही जवळपास आठ लक्ष इतकी आहे. शहरापासून ५५ किलोमीटर लांब असलेल्या मोर्शी  येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठा करणारी योजना ही १९९४ मधील आहे. त्यानंतर २०१६-२०१७ मध्ये अमृत अभियान अमरावती शहराकरिता २०३३ ची लोकसंख्या ८,८३,९५४ इतकी गृहीत धरून प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, ती स्थिती आजच निर्माण झाली आहे.  

पुन्हा आंदोलन?शिदोरी उशाशी अन् माणसे उपाशी अशी स्थिती अमरावतीकरांवर ओढवली आहे. अमरावती शहराची भरभराट होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. या शहरात वास्तव्यासाठी लोक उत्सुक आहेत. पाण्यासाठी मात्र आंदोलन करायचे का, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे. 

आमच्याकडे नळाला पिण्याचे पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. आले तरी पूर्ण पाणीसुद्धा भरून होत नाही तोच पाणी जाते. पाणी येईल म्हणून कोणाला तरी घरीच थांबावे लागते. - रेखा मानकर

नळाची वेळ निश्चित नाही. कधी रात्री ११, तर कधी १२ वाजता पाणी येते. कामावरून आल्यानंतर पाण्याची वाट पाहावी लागते. अनेकदा तक्रार केली आहे. - शिवांगी वेरूळकर 

उन्हाळा असल्याने पाण्याची वाढली मागणी 

शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता अप्पर झोन व लोअर झोन अशी विभागणी केली आहे. प्रेशर काही ठिकाणी कमी आहे. मोर्शी येथील अप्पर धरणावर नियमित चार पंपाद्वारे पाणी घेतले जाते. मागणी वाढल्याने एक पंप पुढील आठवड्यात सुरू होईल. पाईपलाईन जुनी असल्याने त्यावर प्रेशर येऊ नये म्हणून काळजी घेत आहे.- विवेक सोळंके, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

 

टॅग्स :water shortageपाणीकपात