शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खासगी वाहनांचे टायर एसटी करणार रिमोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 11:46 IST

एसटीचा टायर पुन:स्तरीकरण (रिमोल्ड) प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून आता खासगी, शासकीय व निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देउत्पन्नवाढीसाठी नवे पाऊल संचालक मंडळाच्या सभेत प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळातर्फ अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. एसटीचा टायर पुन:स्तरीकरण (रिमोल्ड) प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून आता खासगी, शासकीय व निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यात येणार आहेत.

महामंडळाची संचालक मंडळाच्या २४ जुलै रोजी झालेल्या २९ व्या सभेत सर्व टायर पुन:स्तरीकरण सयंत्रामध्ये शिल्लक उत्पादन क्षमतेचा वापर करून इतरांना टायर पुन:स्तरीकरण करून देण्याबाबत आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अमरावती येथे विद्यापीठ मार्गावर एसटी महामंडळाचा टायर पुन:स्तरीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.कोरोनामुळे एसटी महामंडळाचा प्रवासी वाहतूकरूपी उत्पन्नाचा स्रोत बंद आहे. यामुळे उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाने आता नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. त्यात ही सुविधा देण्यात आली आहे. त्यावर नियंत्रणासाठी विभागीय पातळीवर विभाग नियंत्रक यांच्या नियंत्रणाखाली उपयंत्र अभियंत्यांची समिती गठित करण्यात आली आहे.एसटी बसेस सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महामंडळाने मालवाहतूक व आता टायर रिमोल्ड करून देण्याचाही निर्णय घेतला आहे.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रक, अमरावती

टॅग्स :businessव्यवसाय