शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एसटी संप १०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

राज्य शासनाच्या वेतनवाढीचा प्रस्ताव नाकारत एसटी कर्मचारी संपावर आहेत, तर संपात सहभागी होणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने निलंबन, बडतर्फ, प्रशासकीय बदली तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांविरोधात सेवासमाप्ती अशा कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४०६ निलंबित, ४०६ बडतर्फ, ११६  कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.  सहा रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली.  

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी सेवा शासनात विलीन करणाच्या मागणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी राज्यभरातील आगारांमध्ये अघोषित संपावर ठाम आहेत. अमरावती विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला आता ११२  दिवस झाले आहेत.  संपावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने विविध एसटी आगारांच्या प्रवेशद्वारासमोर संपकऱ्यांनी ठाण मांडले आहे.राज्य शासनाच्या वेतनवाढीचा प्रस्ताव नाकारत एसटी कर्मचारी संपावर आहेत, तर संपात सहभागी होणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने निलंबन, बडतर्फ, प्रशासकीय बदली तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांविरोधात सेवासमाप्ती अशा कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४०६ निलंबित, ४०६ बडतर्फ, ११६  कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.  सहा रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली.  एसटी प्रशासनाने संपकरी २०० कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र निश्चित केले आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होणे पसंत केले आहे. दिवसागणिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून एसटीच्या १४६ फेऱ्या होत आहेत. आजघडीला ५५ चालक, ४५ वाहक कामावर परतले आहेत.

५० बसच्या फेऱ्याकंत्राटी तसेच नियमित कर्मचारी कामावर परतत असल्याने प्रवासी वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अमरावती विभागातील आगारात अंशतः सुरू झाली आहेत. सद्यस्थितीत ५० बसद्वारे फेऱ्या सुरू झाल्या आहेत.  अमरावती ५२, बडनेरा ०८ , परतवाडा ०६ , वरूड २४, चांदूर रेल्वे ०४ , दर्यापूर १६, मोर्शी २८, चांदूर बाजार ०८ याप्रमाणे आगारानिहाय फेऱ्या सुरू आहेत.

एसटी कर्मचारी लोकशाही मार्गाने शांततेने दुखवट्यात सहभागी झाले आहेत. राज्य शासनाला विलिनीकरणाचा प्रस्ताव न्यायालयात सादर करण्यात आला आहे. यावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार असून त्यानंतर दुखवट्याची पुढील दिशा ठरवली जाणार आहे  - संजय मालवीयएसटी कर्मचारी

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप