शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी सेवा सुरू, पगार मात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे एसटी सेवाही बंद झाली. लॉकडाऊन शिथिल होताच जिल्ह्यात प्रवासी घेऊन बस धावू लागल्या. यासोबतच मालवाहतुकीसाठी एसटीचा उपयोग होऊ लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र पसरत असताना, जिवाची पर्वा न करता चालक-वाहकांसह अन्य कर्मचारी सेवा बजावत आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांपुढे घरखर्चाचा प्रश्न । कोरोनाने आर्थिक मुद्यावर केले हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला. वेतन रखडल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या त्यांच्यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे एसटी सेवाही बंद झाली. लॉकडाऊन शिथिल होताच जिल्ह्यात प्रवासी घेऊन बस धावू लागल्या. यासोबतच मालवाहतुकीसाठी एसटीचा उपयोग होऊ लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र पसरत असताना, जिवाची पर्वा न करता चालक-वाहकांसह अन्य कर्मचारी सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांचे कोरोनाकाळात बसफेऱ्या बंद असल्याच्या काळातील दोन ते तीन महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्न भेडसावत आहे. अगोदरच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी, तेही वेळेत मिळत नाही. इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत दिले जाते. मग एसटी कर्मचाऱ्यांवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. पण, वेतन झाले नाही. वेतन नसल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक स्थिती खालावली आहे. शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रोष कर्मचाऱ्यांमध्ये आहे. उसनवारीने दिलेल्या पैशांची परतफेड होणार नाही, असे गृहीत धरून एसटी कर्मचाऱ्यांना बँक किंवा सोसायटीच नव्हे, आप्तदेखील काही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी मेडिकल बिल भरले तरी पैसे मिळत नसल्याची माहिती आहे.अनेक अडचणीचा सामनादोन ते तीन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे वीज देयके भरण्यासाठी पैसे नाहीत. कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली, तर दवाखान्यात नेण्याची परिस्थिती नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, हा खरा प्रश्न असून, पैसे नसल्याने एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता, रखडलेले वेतन तातडीने द्यावे, असे एसटी कामगार सेनेचे विभागीय कार्याध्यक्ष एस.आर. शर्मा म्हणाले.रखडलेले वेतन देण्यासाठी अनेकदा संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. परंतु, केवळ आश्वासन मिळाले. रखडलेले वेतन त्वरित देण्यात यावे.- जयसिंह चव्हाणआगार अध्यक्ष, एसटी कामगार संघटनाकारोना काळातही जीव धोक्यात टाकून कामे करीत आहोत. मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने उपासमारच होत आहे. मुलांच्या शिक्षणासोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तातडीने वेतन द्यावे.- शीतल मोहोड,निर्भया प्रमुख, एसटी कामगार संघटना

टॅग्स :state transportएसटी