लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्नवाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी बसचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळ सध्या आर्थिक तोट्यात आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी महामंडळ आणि विविध उपाययोजनांवर भर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातीलच एक भाग म्हणून मालवाहू सेवा सुरू करण्याचा परिवहन महामंडळाचा मानस आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिवहन महामंडळाच्या स्तरावर मालवाहू सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी भविष्यात ही सेवा सुरू झाल्यास गावपातळीवर मालवाहतूक सेवेचे नेटवर पोहोचण्यास मदत होईल.प्रत्यक्षात ही सेवा कितपत यशस्वी ठरेल, यासंदर्भात साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी रेल्वेच्या धर्तीवर ही सेवा सुरू झाल्यास मालाची ने-आण करण्यास या सेवेची मदत होणार आहे.सल्लागार समितीच्या अहवालानंतर निर्णयएसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असले तरी एसटी मालवाहतूक सेवा व्यवहार्य आहे की नाही, यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. ही सल्लागार समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.एसटीची मालवाहतूक सेवा सुरू करण्यासंदर्भात कुठलीच माहिती अथवा सूचना आलेली नाही. यासंदर्भात उच्च पातळीवर निर्णय होईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.- श्रीकांत गभने,विभागीय नियंत्रक
एसटी महामंडळाची मालवाहू सेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:25 IST
राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्नवाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी बसचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
एसटी महामंडळाची मालवाहू सेवा!
ठळक मुद्देउत्पन्नवाढीसाठी प्रयत्न : जुन्या एसटी बसचा होणार वापर!