शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अन् एसटी प्रवाशांचा बांध फुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:13 IST

यवतमाळकडे जाणाऱ्या सर्वसाधारण लाल बस उशिरा सोडण्यात आल्याने रविवारी सायंकाळी प्रवाशांचा रोष उफाळून आला होता.

ठळक मुद्देबसस्थानकावर चक्काजाम : यवतमाळच्या फेऱ्या थांबविल्याने संताप

आॅनलाईन लोकमतअमरावती : यवतमाळकडे जाणाऱ्या सर्वसाधारण लाल बस उशिरा सोडण्यात आल्याने रविवारी सायंकाळी प्रवाशांचा रोष उफाळून आला होता. शिवशाही बसचे महागडे भाडे न परवडणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक परिसरात चक्काजाम केल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. प्रवाशांच्या संतापामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनाही पाचारण करावे लागले.अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज हजारांवर बस ये-जा करतात. त्यातच आता शिवशाही बसची भर पडली आहे. सध्या लग्नासराईमुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.प्रासंगिक करारामुळे प्रवासी वेठीसयवतमाळ येथे जाण्यासाठी प्रवासी रविवारी लाल बसची प्रतीक्षा करीत होते. दुपारनंतर यवतमाळकडे केवळ शिवशाही बसच पाठविण्यात येत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. शिवशाहीचे तिकीट दर अधिक असल्यामुळे बहुतांश प्रवासी हे लाल बसची प्रतीक्षा करीत होते. दुपारची सायंकाळ झाली; मात्र लाल बस न सोडता केवळ यवतमाळ जाणाºया शिवशाहीच सोडल्या जात असल्याचा प्रकार बघून प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. प्रवाशांनी एकत्र येऊन विचारले तेव्हा त्यांना शिवशाहीत जाण्याचा सल्ला मिळाला. यामुळे सुमारे २०० ते ३०० प्रवाशांनी बसस्थानकात येणाºया सर्व गाड्या अडवून धरल्या. यामुळे अन्य वाहनांच्या रांगा लागल्या. प्रवाशांच्या प्रचंड कल्लोळात रस्त्यावरील हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने चांगलाच गोंधळ उडाला. घटनेच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी पाचारण केले. वाहतूक पोलिसांची तर चांगलीच दमछाक झाली. हा प्रकार बघून एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बसस्थानकावर पोहोचले. त्यांनी प्रासंगकि कराराची अडचण सांगितली आणि प्रवाशांची समजूत काढून लाल बस उपलब्ध केल्या. यानंतर वातावरण निवळल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अरुण सिय्या यांनी दिली.