लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इयत्ता दहावीच्या परीक्षेत स्थानिक ज्ञानमाता हायस्कूलचा विद्यार्थी प्रणय शर्मा याने ९९.२० टक्के गुण मिळवून अमरावती जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले. येथील भंवरीलाल सामरा हायस्कूलचा विद्यार्थी ओजस कारंजकर आणि गोल्डन किडस् इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी रसिका कानेटकर या दोघांना ९९ टक्के गुण मिळाले असून, संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. स्थानिक होलीक्रॉस इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी संपदा सुशील चौधरी हिने ९७.८० टक्के गुण मिळविले आहे. अपंग प्रवर्गातून दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा मयूर कदम याने ९९ टक्के गुण मिळवित बाजी मारली.गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १४.९४ टक्क्यांनी घसरला असून, यावर्षीसुद्धा मुलीनींच निकालात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात एकूण २८९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १३४१६ मुले, तर १५५७० मुलींचा समावेश आहे. टक्केवारीत मुले ६३.६७, तर मुली ८०.०९ इतके उत्तीर्ण झालेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात दहावीच्या निकालावर मुलीनींच छाप सोडली आहे.शनिवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर निकाल बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. दरम्यान शाळांमध्येसुद्धा विद्यार्थ्यांनी निकाल कसा जाहीर झाला, याविषयी भेट दिली. दरम्यान परीक्षेनंतर मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंददेखील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात.
SSC Result 2019; अमरावती जिल्ह्यातून प्रणय शर्मा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:27 IST
इयत्ता दहावीच्या परीक्षेत स्थानिक ज्ञानमाता हायस्कूलचा विद्यार्थी प्रणय शर्मा याने ९९.२० टक्के गुण मिळवून अमरावती जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले.
SSC Result 2019; अमरावती जिल्ह्यातून प्रणय शर्मा अव्वल
ठळक मुद्देओजस कारंजकर, रसिका कानेटकर संयुक्तपणे द्वितीय अंपगातून मयूर कदम याने मारली बाजी