शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर श्रीनिवास रेड्डीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:15 IST

अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक तत्कालीन अपर प्रधान मुख्य ...

अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी याला गुरुवारी सकाळी ६ वाजता पोलिसांनी अटक केली. मात्र, ही कारवाई आयपीएस चौकशी पथकप्रमुख अपर पाेलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर झाल्याची माहिती आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने बुधवारी उशिरा नागपुरातून रेड्डीला ताब्यात घेतले.

२५ मार्च रोजी दीपाली चव्हाण यांंनी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात श्रीनिवास रेड्डी हे देखील तितकेच दोषी आहे. गुन्हे दाखल करावे, यासाठी राजकीय, सामाजिक संघटनांनी आंदाेलन केले. दरम्यान राज्य शासनाने दीपाली मृत्यूप्रकरणी श्रीनिवास रेड्डी याच्या भूमिकेच्या चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित केली. आयपीएस चौकशी पथकाने हरिसाल, अमवराती येथे २१ ते २८ पर्यंत दौरा केला. दीपाली प्रकरणाशी निगडित व्यक्ती, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी आयपीएस प्रज्ञा सरवदे अमरावतीत दाखल झाल्या. २७ एप्रिल रोजी सरवदे व त्यांच्या पथकाने हरिसाल गाठले. दीपाली प्रकरणाची संबंधित घटनास्थळाची पाहणी केली. येथे काही ठिकाणी निरीक्षण केले. वन कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आपबितीची माहिती घेतली. येथील राज्य राखीव दलाच्या विश्रामगृहात पथकातील सहकारी सदस्यांनी नोंदविलेल्या बयाणांवर बुधवारी मंथन केले. काही जणांसोबत त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, २८ एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता येथील एसपी कार्यालय गाठले. वस्तुस्थितीच्या आधारे आयपीएस प्रज्ञा सरवदे यांनी श्रीनिवास रेड्डीच्या अटकेचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. त्यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेेचे पथक ॲक्टिव्ह झाले आणि रेड्डी याच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूरच्या दिशेने पोलीस पथक रवाना झाले. दरम्यान डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी मुंबईकडे जाण्यासाठी मार्गक्रमण केले. त्यानंतर वाहनांनी नागपूरकडे रवाना झाल्या. मात्र, सकाळी १० ते १ वाजता दरम्यान आयपीएस चौकशी पथकाने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तीन तास ठिय्या मांडला होता, हे विशेष.

---------------

कोट

धारणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अटक केली. फौजदारी कारवाईसाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही. आरोपपत्र न्यायालयात दाखल करताना मात्र शासनाला कळवावे लागतात. रेड्डीवर भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

- हरी बालाजी एन. पोलीस अधीक्षक, अमरावती