गेल्या १०-१२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलाय. नुकतेच डोके वर काढणाऱ्या अंकुरांनी आता माना टाकल्या आहेत. तरीही ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी पिकांना जगविण्याचा कसाबसा प्रयत्न करीत आहेत. एका शेतात स्प्रिंकलरद्वारे शेतातील पिकांना पाणी देण्याचा खटाटोप चालविला आहे. यातून काही प्रमाणात पिके वाचतीलही. परंतु तरीही त्याला पावसाची सर थोडीच येणार आहे!
पिकासाठी स्प्रिंकलरचा पर्याय :
By admin | Updated: July 5, 2015 00:22 IST