शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST

अमरावती : आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना डोज ...

अमरावती : आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना डोज देण्यात आले. या मोहिमेेला शहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य यंत्रणांच्या चमूने या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जागोजागी बूथ उभारले होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते रायन फर्नांडिस, सौरवी शिरीष किंडे, अभिषेक सोनू उईके, सागर पंकज राजनकर या बालकांना लस पाजून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यावेळी उपस्थित होते. मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ४३० बालकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहता कामा नये, यासाठी गृहभेटीही देण्यात येत आहेत. महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, ढाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

-------------------------

शहरी भागातील पोलिओ लसीकरण

अमरावती : पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिकेच्या राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गाडगे नगर येथे आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका सुरेखा लुंगारे, मनपा वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता सीमा नेताम, जयश्री नांदुरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, साईनगर येथे महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, आयुक्‍त प्रशांत रोडे, नगरसेविका मंजूषा जाधव यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाला प्रारंभ झाला. महापालिका क्षेत्रात ६६ हजार ८९० बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती आहे.