तरूणांचा पुढाकार : जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजींना आदरांजली अमरावती : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ विभागीय कार्यालयात गुरूवारी आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.‘लोकमत’ आणि संत गाडगेबाबा रक्तपेढी तसेच कंपोनंट सेंटर, बडनेराच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ सुनील पाटील, युनिक अकादमीचे संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आ. बच्चू कडू यांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. शिबिरात प्रथमच प्राची मेहरे नामक तरूणीने रक्तदान केले. या शिबिरात तरूणांचा रक्तदानासाठी विशेष उत्साह व पुढाकार दिसून आला. संत गाडगेबाबा रक्तपेढीतर्फे अनिल कविमंडन, सोपान गोडबोले तसेच इतर कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी योगदान दिले. ‘लोकमत’ परिवारातर्फे रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.
‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: July 3, 2015 00:36 IST