शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘हाफ मॅराथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:09 IST

येथील मॅराथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी तिसऱ्या हॉफ मॅराथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१, १० आणि ५ कि.मी. अशा प्रकारे तीन गटाच्या वर्गवारीत ही स्पर्धा घेण्यात आली आली. यात लहान मुलांचा मोठा सहभाग होता. या स्पर्धेत राज्यासह बेंगळुरू, हैदराबाद येथील धावकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

ठळक मुद्दे१३५० स्पर्धक धावले : महाराष्ट्रासह बेंगळुरू, हैदराबाद येथील धावकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मॅराथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी तिसऱ्या हॉफ मॅराथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१, १० आणि ५ कि.मी. अशा प्रकारे तीन गटाच्या वर्गवारीत ही स्पर्धा घेण्यात आली आली. यात लहान मुलांचा मोठा सहभाग होता. या स्पर्धेत राज्यासह बेंगळुरू, हैदराबाद येथील धावकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि जाणता राजा वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉफ मॅराथॉन स्पर्धेला आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते झेंडी दाखवून प्रारंभ झाला. यावेळी क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, प्राचार्य देवनाथ, विजय ठाकरे, उत्तमसिंग ठाकूर आदी उपस्थित होते. येथील विभागीय क्रीडा संकुलातून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत १३५० धावकांनी सहभाग नोंदविला. पहिल्यांदा लहान मुलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविल्यामुळे आयोजकांना काही स्पर्धक मुलांना परत करावे लागले. आॅनलाईन आणि प्रत्यक्ष १४८० स्पर्धकांनी नोंदणी केली असली तरी १,३५० स्पर्धक धावले. टाटा ट्रस्ट, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांनीदेखील या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संजय खोडके, माजी आमदार प्रदीप वडनेरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, अनिल लाहोटी, हरीश देशपांडे, सोमेश्र्वर पुसतकर, दिलीप पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुभाष गावंडे, अतुल पाटील, मुकुंद वानखडे, किशोर वाठ, सतीश दवंडे, हनुमान गुजर, श्रीनिवास उदापुरे, गजानन धर्माळे, नरेंद्र पंचारीया, वासुदेव रोंघे, सुनील जांगडे, ममेश माथनकर, मनीष जामनेरकर आदींनी परिश्रम केले. स्पर्धेदरम्यान पोलीस बंदोबस्त फारसा दिसून आला नाही, हे विशेष.या स्पर्धकांनी पटकाविले रोख बक्षीसहॉफ मॅराथॉनच्या २१ किमी. लांबीच्या स्पर्धेत पुरूष गटातून ४५ वर्ष वयोगटाच्याआतील प्रल्हाद धनावत, अजित भेंडे, अक्षय मोहिते, विनोद सिरसाट, देवा राणे, तर ४५ वर्षे वयोगटाच्यावरील पांडुरंग पाटील, कैलास माने, नागोराव भोयर, घनशाम पदमगिरवार, लक्ष्मण शिंदे यांनी रोख बक्षीसे मिळवली आहे. तसेच महिला गटातून ४० वर्षाच्या आतील ज्योती गवते, पूनम अंकुरकर, रोशनी खोब्रागडे, अनुराधा मोर्य, प्रिती ठाकूर तर ४० वर्षे वयोगटाच्यावरील शोभा देसाई, शारदा भोयर, जयश्री, कामठेवाड, राखी मनियार, श्रृती नानवाणी, राज्याबाहेरील स्पर्धकांमध्ये पुरूषांमध्ये विष्णू राठौर, रणजित सिंह, जगदीश पटेल, तर महिलांमधून सविता श्रृती, बुला मोंडाल यांचा समावेश आहे.१० कि.मी. पॉवर रन गटात पुरूषात हरमज्योत सिंह, किरण मत्रे, अर्जून साळवे तर, महिलांमधून शीतल बारई, यामिनी ठाकरे, नंदीनी पवार यांनी बक्षिसे पटकाविले. तसेच ५ कि.मी. लांबीच्या स्पर्धेत मुलांमधून पवन चव्हाण, सचिन पटेल, कुणाल ब्राम्हणकर तसेच मुलींमधून अश्विनी जाधव, तन्वी खोरणे, अश्विनी अहेरवार यांनी बक्षीसे पटकाविली. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ४ लाख ४० हजार रूपयांची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.