वरूड : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त "लोकमत रक्ताचं नातं" हे अभियान सुरू आहे. यानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात ग्रेट मराठा फाऊंडेशन, पोलीस स्टेशन आणि ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मंगळवारी घेण्यात आले. यामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वरूड ग्रामीण रुग्णालयात दि. ग्रेट मराठा फाऊंडेशन, वरूड पोलीस स्टेशन आणि ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार प्रदीप चौगावकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, दि . ग्रेट मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन गुर्जर, एपीआय सुनील पाटील, हेमंत चौधरी पीएसआय हिवसे, मुकीम उपस्थित होते. यावेळी ४० दात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. यावेळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केले. शिबिराला दि. ग्रेट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन गुर्जर, उपाध्यक्ष नितीन देवघरे, विशाल आजनकर, दीपक कोचर, यशपाल राऊत, रोशन धोंडे, बबलू भोरवंशी, वरूड शहराध्यक्ष धीरज वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
* रक्तदानाच्या माध्यमातून लोकमत सामाजिक दायित्व जोपासणारी संस्था- ठाणेदार प्रदीप चौगावकर
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांनी सामाजिक दृष्टीने समाजाकरिता आणि देशाकरिता आयुष्यभर कार्य केले. यांचे कार्य लोकमतच्या माध्यमातून सुरूच आहे. रक्ताचं नातं सर्वांनी जोपासून कोरोनाकाळात अनेकांना भासणारी रक्ताची चणचण पाहून सामाजिक भावनेने प्रेरित होऊन ''लोकमत रक्ताचं नातं हा अभिनव उपक्रम राबवून सामाजिक दायित्व जोपासले जात असल्याचे वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी सांगितले.