शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत कीटकनाशकांची फवारणी करताना दोन शेतक-यांचा बळी, यंत्रणा हादरली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 19:26 IST

कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय परीक्षण अहवालानंतर शेतकºयांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात ३५ शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर प्रामुख्याने हा प्रश्न चर्च्चेत आला. शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर जिल्ह्यातदेखील अशा घटनांचा शोध घेण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात अशाप्रकारे एकाही शेतकºयाचा मृत्यू झालेला नाही, यावर जिल्हा प्रशासन ठाम होते. मात्र सात आॅक्टोबरनंतर विविध रूग्णालयांकडून माहिती आल्यानंतर दोन महिन्यांत दोन शेतकºयांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने तत्त्वत: मान्य केली आहे. १ जानेवारी ते ७ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाल्याची माहिती कृषी विभागाने सामान्य रूग्णालयाच्या हवाल्याने दिली. मात्र रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती शेतकºयांना विषबाधा झाली याची नेमकी माहिती नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार, माहुली जहांगीर ठाण्यांतर्गत डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्यांतर्गत ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांत शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला, याविषयी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाहीचे निर्र्देश दिले आहेत.

आॅक्टोबरमध्ये विषबाधेचे १३ रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात एक आॅक्टोबरपासून आतापर्यत विषबाधेचे १३ रूग्ण दाखल झालेत, तर एक जानेवारीपासून आतापर्यंत १५४ रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती निवासी उपजिल्हााधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. या रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती रूग्णांना विषबाधा झाली याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून अद्याप मिळू शकली नाही. खासगी रूग्णालयात किती रूग्णांनी विषबाधेचा उपचार घेतला, याबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. 

ही आहेत विषबाधेची कारणेयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी पूरक पावसामुळे कपाशीची झालेली वाढ ही माणसांच्या उंचीपेक्षा अधिक आहे. या पिकावर फवारणी करताना हवेची दिशा बदलल्यास फवारा थेट शेतक-यांच्या चेह-यावर उडतो. नाका-तोंडातून विष थेट शरीरात जाते. बॅटरीमुळे गतीने चालणाºया चायना स्प्रे पंपाचा वापर, अप्रमाणित व अतिविषारी कीटकनाशकांची फवारणी, यंदा सप्टेंबरपासूनच कडक उन्हाचे चटके असल्याने शेतकºयांना आलेल्या घामामुळे उघड्या त्वचेच्या छिद्रातून कीटकनाशकाचे अंश शरीरात जातात आदी कारणांमुळे शेतकºयांना कीटकनाशकांची विषबाधा होते.

कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत शेतकºयांमध्ये जागृती करण्यात येत आहे. सुरक्षित वापराचे निकष पूर्ण न करणारी कीटकनाशके विकणा-या दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.              - प्रवीण पोटे,              पालकमंत्री, अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी