लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा येथे उभारला जात असलेला रेल्वे वॅगन कारखाना आणि नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनामिक्स या मिसाइल कारखान्याला गती यावी म्हणून दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात व रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.बैठकीला पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. सुनील देशमुख, भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहर अध्यक्ष जयंत डेहनकर, किरण पातूरकर, तुषार भारतीय, जिल्हाधिकारी अभिजित बांगर प्रामुख्याने उपस्थित होते.वॅगन दुरुस्ती कारखाना आणि भारत डायनामिक्स या दोन्ही कारखान्यांच्या कामात येत असलेले अडसर दूर करण्यासाठी ना. नितीन गडकरी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या दोन्ही कारखान्यांच्या उभारणीसाठी सोमवारी कालबद्ध कार्यक्रम ठरवण्यात आला. संबंधित विभागांच्या अधिकाºयांना उपस्थित ना. गडकरींनी कडक शब्दात सूचना दिल्या. काही अडचणी तात्काळ मार्गी लावल्या. या संबंधातील अनेक बारीकसारीक बाबींवर याप्रसंगी तपशीलवार चर्चा झाली.
रेल्वे वॅगन, मिसाईल कारखान्याला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:50 IST
बडनेरा येथे उभारला जात असलेला रेल्वे वॅगन कारखाना आणि नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनामिक्स या मिसाइल कारखान्याला गती यावी म्हणून दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात व रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
रेल्वे वॅगन, मिसाईल कारखान्याला गती
ठळक मुद्देनितीन गडकरींचा पुढाकार : अधिकाऱ्यांना दिल्या सूचना