शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा बाजारही संभ्रमात, भाव ठरेना

By admin | Updated: October 16, 2014 23:18 IST

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सट्टाबाजारात उमेदवारांच्या विजयाचे भाग्य उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र झालेल्या मतदानानंतरची स्थिती अतिशय गोंधळाची झाल्याने सट्टा

अमरावती : बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सट्टाबाजारात उमेदवारांच्या विजयाचे भाग्य उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र झालेल्या मतदानानंतरची स्थिती अतिशय गोंधळाची झाल्याने सट्टा बाजारात संभ्रम कायम आहे. उमेदवारांच्या विजयावर भाव ठरविताना सट्टा व्यावसायिकांनाही घाम सुटला आहे.अमरावती मतदारसंघ वगळता अन्य कोणत्याही मतदारसंघातील विजयी उमेदवार कोण? हे ठरविताना सट्टा व्यावसायिकांची गणिते बिघडली आहेत. मतदान प्रक्रिया आटोपून दोन दिवस झाले असताना विजयी उमेदवारांचे भाव निश्चित होत नसल्याची माहिती हाती आली आहे. अमरावतीत काँग्रेसचे रावसाहेब शेखावत आणि भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत आहेत. त्यानुसार सट्टा बाजारात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर कोण? राहील याविषयी सट्टा लावला जात आहे. सट्टा बाजारात सुनील देशमुख यांना बाजूने झुकतेमाप देत असले तरी मुस्लिम वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये रावसाहेब शेखावतांना मिळालेला प्रतिसाद बघता सट्टा व्यावसायिकही संभ्रमात आहेत. त्यामुळे अमरावतीत धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत आहेत. दर्यापूर, मोर्शी, अचलपूर, धामणगाव, मेळघाट, बडनेरा, तिवसा या मतदार संघात दुहेरी, तिहेरी लढत असल्याने सट्टा बाजारात स्थिर भाव ठरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी उुशरा रात्री काही मतदारसंघांत होणाऱ्या लढतीतील उमेदवारांचे सट्टाबाजारात भाव निश्चित झाल्याची माहिती आहे. यात दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव, अचलपूर, मेळघाट व मोर्शी या मतदारसंघांचा समावेश होता.युती, आघाडीतील घरोबा संपुष्टात आल्यामुळे सर्वच पक्षांची उमेदवार ठरविताना दमछाक झाली. काही पक्षांना वेळेवर उमेदवार निश्चित करावे लागले. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात होते. निवडणुकीच्या प्रचाराला कालावधी कमी मिळाल्याने उमेदवारही मतदारापर्यत पोहोचू शकले नाहीत. परिणामी काय निकाल लागेल, उमेदवारही संभ्रमात आहेत. त्यामुळे सट्टा बाजारात भाव ठरविताना व्यावसायिक मागे पुढे बघत आहे.