लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर दर्शनासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकरिता रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी १ व ५ डिसेंबर रोजी दोन रेल्वे गाड्या सुटणार आहेत.दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखो अनुयायी मुंबईकडे प्रस्थान करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर प्रचंड ताण येतो. नियमित रेल्वे गाड्यांमध्ये होणाºया गर्दीने आरक्षित डब्यांतून प्रवास करणाºयांची गैरसोय होते. त्यामुळे यंदा रेल्वे प्रशासनाने विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या मुंबईकडे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री ११.५५ वाजता नागपूरहून ०१२६२ क्रमांकाची नागपूर- सीएसटी गाडी सुटेल. मध्यरात्रीनंतर दीड वाजता ती धामणगाव, १.५५ वाजता बडनेरा येथे पोहचेल. बुधवारी सकाळी ७.५० वाजता ०१२६४ क्रमांकाची रेल्वे नागपूरहून सुटेल. ती धामणगाव येथे सकाळी ९.५० वाजता, तर बडनेरा येथे १०.३५ वाजता येईल. त्याच दिवशी ०१२६६ क्रमांकाची रेल्वे दुपारी ३.५५ वाजता नागपूरहून सुटणार आहे. ती रेल्वे धामणगाव येथे ५.५८, तर बडनेरा येथे ७.३० वाजता येणार आहे. त्यानंतर या रेल्वे पुढे मुंबईसाठी रवाना होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे.मुंबईहून परतीसाठी स्वतंत्र गाड्यामुंबईहून आंबेडकरी अनुयायींना परतीसाठी स्वतंत्र चार गाड्या असणार आहेत, तसे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. यात ६ डिसेंबर रोजी ०१२४९ व ०१२५१ क्रमांकाच्या रेल्वे गाड्या सुटणार आहेत. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी ०१२५३ व ०१२५५ तर ८ डिसेंबर रोजी ०१२५७ व ०१२५९ अशा रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. आंबेडकर अनुयायांनी रेल्वे प्रवास करताना तिकीट घेऊनच प्रवास करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अजनीहून ७ डिसेंबर रोजी सुपरफास्टनागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकाहून शनिवार, ७ डिसेंबर रोजी अजनी- मुंबई सीएसटी सुपरफास्ट रेल्वे धावणार आहे. ती अजनी येथून दुपारी ३ वाजता निघणार आहे. धामणगाव रेल्वे स्थानकावर ४.५३ वाजता, तर बडनेरा येथे सायंकाळी ६.०२ वाजता पोहणार आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:55 IST
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर दर्शनासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकरिता रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी १ व ५ डिसेंबर रोजी दोन रेल्वे गाड्या सुटणार आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या
ठळक मुद्देनागपूर येथून ४, ५ डिसेंबर रोजी रेल्वे : मुंबईहून परतीसाठी चार गाड्या