शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

विशेष रेल्वे गाड्या रुळांवर, प्रवाशांच्या खिशाला दुप्पट कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST

(श्यामकांत सहस्त्रभोजने) असाइनमेंट बडनेरा : कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. विशेष रेल्वे गाड्या अधिक संख्येने धावण्यास सुरुवात ...

(श्यामकांत सहस्त्रभोजने) असाइनमेंट

बडनेरा : कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. विशेष रेल्वे गाड्या अधिक संख्येने धावण्यास सुरुवात झाली. मात्र, टिकिटाचे दर दुप्पट झाल्याने प्रवाशांना अतरिक्त भुर्दंड बसत आहे. आता प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. असे असताना विशेष रेल्वे गाड्यांचे प्रवासभाडे महागल्याने याचा आर्थिक फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे.

जिल्ह्यात बडनेरा रेल्वे स्थानक जंक्शन म्हणून दूरपर्यंत परिचित आहे. येथून मोठा प्रवासी वर्ग ये- जा करताे. लॉकडाऊननंतर सारे काही सुरळीत होत आहे. कोरोना संसर्गाची भीतीदेखील कमी झाली आहे. रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांची रेलचेल वाढली. विशेष रेल्वे गाड्या बऱ्याच संख्येने रुळावर धावत आहे. मात्र, त्याचे प्रवासभाडे दुप्पट, तिप्पट असल्याने प्रवाशांच्या खिशाला जास्तीचा भार सोसावा लागत आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटाचा बोजा त्यात रेल्वेने केलेली प्रचंड दरवाढ प्रवास करणाऱ्यांसाठी मनस्ताप ठरत आहे. लवकरच पूर्वीप्रमाणे नियमित रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, ज्यामुळे प्रवासी वर्गांना दिलासा मिळू शकेल. कोरोनामुळे विदर्भात मुंबई-पुण्याहून परत आलेले नोकरदार पुन्हा कामकाजासाठी जात आहेत. या सर्वांना रेल्वेचा प्रवास सोयीचा आहे. मात्र विशेष रेल्वे गाड्यांची दुप्पट भाडेवाढ प्रवाशांसाठी महागडी झाली आहे. रेल्वे प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेणे तेवढेच गरजेचे आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटाचा बोजा त्यात तिकीट दरांतील प्रचंड वाढ प्रवाशांची डोकेदुखी झाली आहे. विशेष रेल्वे गाड्यांची संख्या अधिक आहे. याच गाड्यांचे प्रवासभाडे प्रवाशांना 'न' परवडणारी ठरत आहे.

पॉईंटर्स-

* कोरोना आधी बडनेरा रेल्वे स्थानकाहून ६० रेल्वे गाड्या धावत होत्या. यात आठवड्यातील विविध दिवसांच्या गाड्यांचादेखील समावेश होता.

* लॉकडाऊननंतर बड़नेरा रेल्वे स्थानकाहून ३० च्या जवळपास प्रवासी गाड्या धावतात. यामध्येदेखील आठवड्यातून एक, दोन, तीन किंवा चार दिवसांच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

-----------------------

बॉक्स

छोट्या अंतरावरील प्रवासभाड़े

बडनेरा रेल्वे स्थानकापासून कमी अंतरावर असलेल्या अकोला रेल्वे स्थानकाचे कोरोना आधी पॅसेंजर गाडीचे भाड़े २० रुपये, एक्सप्रेस ८५ रुपये होते. आता कोरोनानंतर विशेष रेल्वेचे ४१५ रुपये भाड़े आकारले जात आहे. कमी अंतरावरील रेल्वे स्थानकाचे भाडे जास्त असल्याने हे प्रवासभाडे अवाक करणारे आहे.

----------------------

बॉक्स

मोठ्या अंतरावरील प्रवास भाड़े

बडनेरा रेल्वे स्थानकाहून भुसावळपर्यंतच पॅसेंजर गाड्या धावतात. कोरोना आधी मुंबईपर्यंतचे तिकीट दर ३९० रुपये होते. आता विशेष रेल्वे गाडीचे ५०५ तिकीट दर आकारले जात आहे. नाईलाजास्तव प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागते आहे.

-------------------

कोट

कोरोनामुळे काम धंदे ठप्प आहेत. कामाच्या शोधात प्रवास करावा लागतो. मात्र रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांमध्ये भाडेवाढ केली ती परवडणारी नाही. पूर्वीप्रमाणेच टिकीट दर आकारावेत प्रवासी रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

.- राजेश गडलिंग, प्रवासी

कोट

रेल्वे प्रशासनाने लॉकडाउन नंतर रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ केली. मात्र त्याच बरोबर स्पेशल ट्रेनच्या नावाने भाडेवाढदेखील केली. भाडेवाढ पूर्ववत करावी. हे प्रवासभाडे सामान्यांना परवडणारे नाही.

- रोशन जिकर मोटलानी, धनज, प्रवासी