शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

फासे पारधी विद्यार्थ्यांनी बनविल्या खास टिपऱ्या: सातपुडा पर्वत रांगेतील देवकाळी वृक्षांच्या फांद्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:59 IST

पारधी समाजातील ४५० मुले चक्क स्वकौशल्याचा वापर करून टिपऱ्या बनवीत आहेत.

ठळक मुद्देपारधी समाजातील ४५० मुले चक्क स्वकौशल्याचा वापर करून टिपऱ्या बनवीत आहेत. ‘दांडिया’शी दूरदुरचा संबंध नसला तरी, 'आम्ही बनविलेल्या टिपऱ्या विकत घ्या आणि दांडिया एन्जॉय करा', अशी विनवणी ही मुले लोकांना करीत आहेत पारधी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प घेतलेल्या मतीन भोसले यांच्या मंगरूळ चव्हाळा गावातील ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेत हे चिमुकले हात सद्यस्थितीत टिपऱ्या बनविण्यात व्यस्त झाले आहेत.

- गणेश वासनिकअमरावती, दि.11-  एरवी फक्त भीक मागण्यासाठी पसरणारे हात आणि माथ्यावर ‘चोर’ असल्याचा शिक्का घेऊन उघड्यावर जगणारी पारधी समाजातील ४५० मुले चक्क स्वकौशल्याचा वापर करून टिपऱ्या बनवीत आहेत. ‘दांडिया’शी दूरदुरचा संबंध नसला तरी, 'आम्ही बनविलेल्या टिपऱ्या विकत घ्या आणि दांडिया एन्जॉय करा', अशी विनवणी ही मुले लोकांना करीत आहेत. पारधी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प घेतलेल्या मतीन भोसले यांच्या मंगरूळ चव्हाळा गावातील ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेत हे चिमुकले हात सद्यस्थितीत टिपऱ्या बनविण्यात व्यस्त झाले आहेत. 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे सन २०१२ पासून ‘प्रश्नचिन्ह’आश्रमशाळा लोकवर्गणीतून चालविली जात आहे. राज्य शासन ‘प्रश्नचिन्ह’ला अनुदान देईल, ही आशा आजही मतीन भोसले यांना आहे. मात्र, राज्यासह अन्य प्रांतातून आश्रमशाळेत आणलेल्या फासे पारधी समाजाच्या मुला-मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी ते जीवाचे रान करीत आहेत. आश्रमशाळेतील फासे पारधी समाजाची मुले वाममार्गाला लागू नयेत, ही त्यांची तगमग आहे. 

२१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून नऊ दिवस अमरावती जिल्ह्यात दांडियाची धूम असते. त्यामुळे हा उत्सव ‘कॅश’ करून पारधी मुलांना रोजगार देण्याची संधी मतीन भोसले यांनी हेरली आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाच हजार टिपऱ्या पारधी मुलांनी तयार केल्या आहेत. टिपऱ्यांसाठी लागणाऱ्या काड्या सातपुडा पर्वत रांगेतील देवकाळी वृक्षांच्या फांद्यापासून बनविल्या जात आहेत. या मुलांना टिपºया तयार करण्याचे प्रशिक्षण मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानचे अजय किंगरे यांनी दिले आहे. 

शाळा सांभाळून टिप-या बनविण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. आश्रमशाळेला अनुदान नसल्याने पारधी मुलांना दोन वेळेचे जेवण कसे देता येईल, याचे नियोजन करण्यासाठी मतीन भोसले यांनी टिप-या बनविण्याचा पर्याय निवडला आहे. दांडियाची एक जोडी ५० रुपयांना विकली जात आहे. रासगरबा खेळा पण टिपऱ्या घेणार असाल तर आमच्याकडून विकत घ्या, अशी भावनिक साद फासेपारधी मुला-मुलींनी घातली आहे.                        

कोण आहेत मतीन भोसले ?मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी समाजातील मुला, मुलींच्या शिक्षणासाठी ‘प्रश्नचिन्ह’ नामक आश्रमशाळा स्थापन करून राज्यभरात प्रसिद्ध झालेले मतीन भोसले पूर्वी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. परंतु फासेपारधी समाजाची दैनावस्था बघून ते हताश झाले. या समाजातील मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याच्या वेडाने त्यांना झपाटले. त्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. आणि फासेपारधी मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास घेतला. अखेर रेल्वे स्टेशन, बसस्थानक, हॉटेल, भंगार वेचणाºया फासेपारधी मुला, मुलींना त्यांनी ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेत आणले. ही आश्रमशाळा आजही ते लोकवर्गणीतून चालवित आहेत