शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील लोणीच्या ठाणेदारांना विशेष सेवापदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 14:50 IST

लोणीचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना व त्यांनी बजावलेल्या खडतर व कठीण सेवेबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने विशेष सेवा पदक मंजूर झाले आहे.

ठळक मुद्देनक्षली भागातील विशेष कामगिरीची दखल२६ जानेवारीला होणार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोणीचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना व त्यांनी बजावलेल्या खडतर व कठीण सेवेबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने विशेष सेवा पदक मंजूर झाले आहे.गोंदिया जिल्ह्यातील नक्षली व खडतर भागात विशेष कामगिरी करणारे सध्या अमरावती ग्रामीण पोलीस विभागात लोणीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या उपस्थितीत विशेष सेवा पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन २०११ ते २०१४ दरम्यान ज्यांची नियुक्ती गोंदिया जिल्हा व नक्षली भागात होती, गोंदिया जिल्ह्यात तालुक्यांतील नक्षली कारवाया रोखण्यात त्यांनी यश मिळविले होते. नक्षली भागातील विविध गुन्ह्यांची उकल त्यांनी केली होती. या विशेष कामगिरीबद्दल सरकारने त्यांची विशेष सेवा पदकासाठी निवड केली. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.लोणी ठाणेदार नागेश चतरकर यांनी सन २०११ ते २०१४ दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षली भागात सेवा देत असताना त्यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप झळके होते. आज विशेष सेवा पदकदेखील अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्याच हस्ते स्वीकारण्याचा हा महत्त्वपूर्ण योग असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिस