शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

विशेष रस्ते अनुदान ‘बी अ‍ॅन्ड सी’कडे

By admin | Updated: April 8, 2016 00:07 IST

राज्य शासनाकडून मिळणाऱ्या विशेष रस्ते अनुदानातील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे.

शासन निर्णय : अमरावती महापालिकेचा समावेशअमरावती : राज्य शासनाकडून मिळणाऱ्या विशेष रस्ते अनुदानातील कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला मंजूर रस्ते अनुदानाचे ९ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करावा लागणार आहे. आ.रवी राणा यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यानी अमरावती महापालिकेचा समावेश केला आहे.राज्यातील महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना रस्ते आणि अनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी ‘रस्ता अनुदान’ देण्यात येते. त्याअनुषंगाने रस्ता अनुदानातून विकासकामे करण्यासाठीची यंत्रणा निश्चित करण्यासाठी सदर स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, शासनाने अवर सचिव विवेक कुंभार यांनी २८ मार्च रोजी आदेश निर्गमित करून रस्ता अनुदानातील कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही यंत्रणा ठरविली आहे. या शासनआदेशात अमरावती महापालिकेचा समावेश आहे. रस्ते अनुदानाचा मंजूर निधी महापालिकेला आता विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करावे लागणार आहे. विशेष रस्ते अनुदानासाठी कार्यन्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग ठरविताना अमरावती व सांगली- मिरज- कुपवाड या दोन महापालिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चांदूरबाजार नगरपरिषदेसह राज्यातील १२ नगरपरिषदांचा शासन निर्णयात समावेश आहे. आ.रवी राणा यांनी रस्ता अनुदानातील कामे ही महापालिका यंत्रणा न ठेवता ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवावीत, असे पत्र काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले होते. त्यानुसार रस्ते अनुदानाची विकास कामे करण्यासाठीची यंत्रणा ही ‘बी अ‍ॅन्ड सी’ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तापक्ष विरुद्ध आ. रवी राणा असे शीतयुद्ध पेटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)