पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षकांच्या कोरोना तपासणीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:57+5:302021-01-22T04:12:57+5:30

अमरावती : राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने शालेय ...

Special campaign for corona examination of teachers from 5th to 8th | पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षकांच्या कोरोना तपासणीसाठी विशेष मोहीम

पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षकांच्या कोरोना तपासणीसाठी विशेष मोहीम

Next

अमरावती : राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने पूर्वतयारी म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यास आरोग्य विभागाला अवगत केले आहे. प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांंनी २१ जानेवारी रोजी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नियोजनाबाबत कळविले आहे.

१८ जानेवारी रोजीच्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायती यासह खासगी शाळांतील पाचवी ते आठवीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी अनिवार्य केली आहे. २७ जानेवारी रोजी शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करून अहवाल शाळेत सादर करावे लागणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात ही मोहीम राबवावी लागणार आहे. २७ जानेवारीपूर्वीच कोरोना टेस्ट करण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेने करावे, असे प्रभारी सीईओ तुकाराम टेकाळे यांनी पत्राद्धारे केले आहे. यात आरटीपीसीआर, रॅपीड अँटिजेन तपासणी करावी लागेल, असे उल्लेखित आहे.

-----------------

आरोग्य यंत्रणेला तालुकानिहाय यादी

अमरावती जिल्ह्यात १४ तालुक्यानिहाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी कोरोना तपासणीकरिता आरोग्य यंत्रणेकडे शिक्षण विभागाने पाठवली आहे. तालुक्याच्या स्ंख्येनिहाय तपासणीसाठी नियोजन करावे, असे पत्रात म्हटले आहे. २७ जानेवारीपर्यंत तपासणी करून अहवाल मिळावा, असे नियोजन आरोग्य यंत्रणेला करावे लागणार आहे. कोरोना तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी केंदावर नियुक्त करण्याबाबत कळविले आहे.

------------------

सीईओंच्या आदेशानुसार मुख्याध्यापकांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्याबाबत पत्र पाठविले आहे. जिल्ह्यात पचवी ते आठवीचे २.१०५ शाळा, ९,२१८ शिक्षक असून, ४०० पेक्षा अधिक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. २७ जानेवारीपर्यंत तपासणी अहवाल सादर करण्याचे कळविले आहे.

- प्रिया देशमुख. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: Special campaign for corona examination of teachers from 5th to 8th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.