शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या लसीकरणासाठी दर शनिवारी विशेष शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

अमरावती : कोविड प्रतिबंधक लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती व दिव्यांगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर दर शनिवारी दिव्यांगांच्या लसीकरणासाठी ...

अमरावती : कोविड प्रतिबंधक लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती व दिव्यांगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर दर शनिवारी दिव्यांगांच्या लसीकरणासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी येथे दिले.

जिल्हाधिकारी नवाल यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्याचबरोबर अनाथ बालक संगोपन जिल्हा कृती दलाची (टास्क फोर्स) ऑनलाईन बैठकही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांच्यासह बाल संगोपन कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, ठिकठिकाणी नियमितपणे होणाऱ्या लसीकरणात वृद्धजन, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर दिव्यांगासाठीच्या शाळा, वसतिगृहे, पुनर्वसन केंद्रे, निवासी संस्था आदी ठिकाणी दर शनिवारी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे. लसीकरण केंद्रांवर टोकन सिस्टीम सुरू केल्यामुळे नागरिकांची गर्दी टळून त्यांच्या वेळेचीही बचत होत आहे. लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी शिबिर मोडवर काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार गॅस एजन्सी कर्मचारी, बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रांसाठी शिबिरांचे नियोजन करावे. कोरोना प्रतिबंधासाठी आघाडीवर कार्यरत आशा सेविका, आरोग्य सेविकांना मास्क आदी सामग्री नियमितपणे उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

अनाथ बालक संगोपनासाठी कार्यवाही

कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन होणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती वेळीच कळणे आवश्यक आहे. उपचारासाठी दाखल बाधिताचे निधन झाल्यास त्याच्यावरील अवलंबितांची माहिती वेळीच डेथ फॉर्ममध्ये भरून घ्यावी. तशी प्रक्रिया रुग्णालयांनी वेळीच पार पाडून संबंधित बालकांबाबत टास्क फोर्सला तात्काळ कळवावे, जेणेकरून संगोपनाबाबत पुढील प्रक्रिया गतीने होईल. यासाठी सर्व रुग्णालयांना सुस्पष्ट सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

कोविडमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यू पावले आहेत, अशी बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी व अनाथ बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती भडांगे यांनी दिली.