परतवाडा : अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सरळ सेवा नोकरभरती प्रकरणात सभापती सचिवांसह संचालक सचिव नोकर भरती घोटाळा प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट झाले आहे तर दुसरीकडे आता सहाय्यक सचिवाच्या निलंबनानंतर सचिवाला सुद्धा गुन्हा दाखल झाल्याने निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे प्रकरणातील आरोपींची संख्या आता सात वरून २६ झाली आहे
अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरळ सेवा नोकर भरती प्रकरणात घोळ करण्यात आल्याची तक्रार झाल्यानंतर नोकर भरती करणाऱ्या के एन के कंपनीसह सहाय्यक सचिव शिपाई इत्यादी सात जणांविरुद्ध पोलिसांनी भादवि च्या ४२०, ४६५,४६८,४७१,३४,१२० ब अन्वय गुन्हे दाखल केले होते यात आरोपींना अटकही करण्यात आली त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून आरोपींनी जामीन मिळविला होता
बॉक्स
तीन महिन्यानंतर जामीन मंजूर
सरळ सेवा नोकर भरती प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सभापती सचिव व संचालक यांनी आपल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो या भीतीपोटी शहरातून भुर्रर्र झाले होते .तर वकिलांमार्फत अचलपूर न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता ६ एप्रिल रोजी तात्पुरता जामीन मंजूर झाला होता त्यावर २६ जून रोजी न्यायालयाने जामीन कायम केला असून सचिव पवन सार्वे व एका संचालकांचा जामीन मंजूर झाला नाही
बॉक्स
सचिवाचे निलंबन तेव्हा?
सहाय्यक सचिव मंगेश भेटाळू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खातेनिहाय चौकशी व निलंबन करण्यात आले होते त्यानंतर जिल्ह्यातील या मोठ्या बाजार समितीच्या नोकर भरती घोटाळ्यात सचिव पवन सार्वे विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झाल्याने आता निलंबन केव्हा असा प्रश्न निर्माण झाला असून दुसरीकडे विना सचिवाची बाजार समिती राहणार आहे
बॉक्स
सभापती, सचिव , आरोपी संख्या २६
अचलपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरती घोटाळ्यात सात आरोपींची संख्या आता एकूण २० ने वाढून २६ झाली आहे त्यामध्ये सभापती अजय मधुकरराव पाटील, उपसभापती गोपाल वासुदेव लहाने, सचिव पवन सार्वे, संहालक विजय अजाबराव काळे, बाबुराव नारायण गावंडे, गजानन प्रल्हाद भोरे, अमोल मुरलीधर चिमोटे, दीपक माधव पाटील, वर्षा नरेंद्र पवित्रकार, किरण दिलीप शेळके, गंगाधर रामकृष्ण चौधरी, गंगाराम शंभूजी काळे, राजेंद्र रामराव गोरले, शिवराज प्रभाकर काळे, आनंद विश्वनाथ गायकवाड, सुधीर शेषराव रहाटे, सतीशकुमार बाबुलाल व्यास, महादेव दशरथ घोडेराव, शंतनु सतीश चित्रकार, साहेबराव लक्ष्मणराव काठोडे,असे एकूण आरोपी २६ झाले आहेत
बॉक्स
पोलिसांना सहकार्य रविवारी ठाण्यात हजेरी
अचलपुर न्यायालयाने जामीन देताना सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये हजेरी व सदर प्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे तर अचलपूर न्यायालयात संचालकाच्या जामिनासाठी वेगवेगळ्या वकिलांमार्फत अर्ज सादर करण्यात आला होता
कोट
बाजार समिती सभापती सचिव व संचालक मंडळांना अचलपुर न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी नोकर भरती प्रकरणात आरोपी म्हणून गुन्ह्यात ते समाविष्ट झाले आहेत
सेवानंद वानखडे
ठाणेदार अचलपूर