संकटाची मालिका : ‘सोन्याचा पाऊस’ तारणार काय?गजानन मोहोड- अमरावतीआधीच दोन महिने उशिरा झालेली पेरणी, त्यानंतर आलेली ‘खोडकूड’, निकृष्ट बियाण्यांमुळे रोपांवर झालेला ‘पिवळा मोझॅक’, पावसाचा खंड आणि सद्यस्थितीत दोन आठवड्यांपासून असलेल्या ‘वाफशा’ (आॅक्टोबर हिट) मुळे अपरिपक्व स्थितीत सोयाबीन करपले आहे. मध्यम स्वरुपाच्या शेतीमध्ये हे संकट उद्भवले आहे. संकटांची मालिका सुरू असताना दसऱ्याला आलेला ‘सोन्याचा पाऊस’ सोयाबीनला पोषक ठरण्याची आशा शेतकरी करीत आहेत. ‘वॉटर सेंसेटीव्ह क्रॉप’ अशी सोयाबीनची ओळख आहे. सोयाबीनच्या १०० दिवसांच्या जीवनचक्रात फुलोरावर असताना व शेंगा भरण्याच्या स्थितीत पावसाची नितांत आवश्यकता असते. परंतु यंदा मात्र विपरीत स्थिती जाणवत आहे. उशिरा झालेल्या पेरणीवर पावसाने मारलेली दीर्घ दडी, जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण तसेच दिवसाचे उष्णतामान व रात्रीचा थंडावा अशा या प्रतिकूल स्थितीत सोयाबीनची अवस्था अकाली म्हातारे (फोर्स मॅच्युरिटी) तसेच अपरिपक्व अशी झाली आहे. सोयाबीन करपण्याची कारणे-सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस नाही. त्यामुळे झाड अपरिपक्व (फोर्स मॅच्युरिटी) स्थितीत मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील आर्द्रता कमी झालेली आहे.-एकाच शेतात दरवर्षी सोयाबीन पीक घेतल्याने ‘मूळ खोडसर’ या बुरसीजन्य रोगाचा प्रादुर्भाव.-जमीन कोरडी, दिवसाचे प्रचंड उष्णतामान, रात्रीची थंडी या विषम हवामानाचा पीकवाढीवर झालेला परिणाम. -जमीन तापल्याने ‘बुरशी’ सक्रिय होते व खोडकिडाचा प्रादुर्भाव होतो.
सोयाबीन करपतेय
By admin | Updated: October 4, 2014 23:17 IST