शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
2
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
3
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
4
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
5
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
6
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
7
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
8
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
9
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
10
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
11
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
12
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
13
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
14
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
15
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
16
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
17
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
18
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
19
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
20
बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?

धामणगाव तालुक्यातील सोयाबीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST

धामणगाव तालुक्यात यंदा २५ हजार ४३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात ९३०५, जेए ३३५, ३३६ या लवकर येणाऱ्या वाणांची सर्वाधिक १६ हजार २८९ हेक्टरमध्ये पेरणी जून महिन्यातच झाली. नंतर पावसाने आठ दिवस खंड दिला. मात्र, सोयाबीनची स्थिती मध्यंतरीच्या काळात सुधारली. पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, तालुक्यात सतत पाच दिवसांपासून पावसाची हजेरी असल्याने पिके पाण्याखाली आली.

ठळक मुद्देसंकट : प्रथम खोडकिडी आता कोंब, सलग पाचव्या दिवशी पाऊस

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : प्रथम अल्प पाऊस, त्यानंतर खोड किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने शेंगांची वाढ खुंटली. तालुक्यात आता पाच दिवसांपासून अधूनमधून सलग सुरू आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या तब्बल सात हजार हेक्टरमधील सोयाबीनला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर हे नवीन संकट ओढवल्याने चिंतेत भर पडली आहे.धामणगाव तालुक्यात यंदा २५ हजार ४३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात ९३०५, जेए ३३५, ३३६ या लवकर येणाऱ्या वाणांची सर्वाधिक १६ हजार २८९ हेक्टरमध्ये पेरणी जून महिन्यातच झाली. नंतर पावसाने आठ दिवस खंड दिला. मात्र, सोयाबीनची स्थिती मध्यंतरीच्या काळात सुधारली. पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, तालुक्यात सतत पाच दिवसांपासून पावसाची हजेरी असल्याने पिके पाण्याखाली आली. लागलीच खोडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक शेंगा बेपत्ता झाल्या आहेत. उर्वरित शेंगा भरत असताना, आता तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला.तालुक्यात पाऊस दररोज दमदार हजेरी लावत आहे. ज्या शेतात जलसंचय होतो, त्या शेतात भरलेल्या शेंगांना कोंब फुटत आहे. तालुक्यातील गव्हा फरकाडे, कावली, वसाड, अंजनसिंगी, नायगाव, सोनोरा काकडे, चिंचोली, झाडगाव, गिरोली, चिचपूर, मंगरूळ दस्तगीर, झाडा, आष्टा तसेच नदीकाठच्या अनेक शिवारांतील सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसू लागला आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असताना जेमतेम जुळवाजुळव करून शेतकºयांनी बी-बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली. पिकांची स्थितीसुद्धा चांगली होती. परंतु आता अर्धे पीक खराब झाले असून पावसामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबाला दोन वेळचे अन्न द्यायचे कसे, असा प्रश्न काही शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. गतवर्षी अनेक शेतकºयांना पीक नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही, त्या शेतकºयांच्या तालुका मुख्यालयी येरझारा सुरूच आहेत. शासनाने या संकटकाळात तरी त्वरित मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.तालुक्यातील कमी अधिक पाऊस तसेच सोयाबीनला खोडअळीचा प्रादुर्भाव व आता कोंब फुटल्यामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. संबंधित यादी प्रशासनाकडे त्वरित पाठविण्यात येईल.- सागर इंगोले,तालुका कृषी अधिकारीपाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले. दरवर्षीप्रमाणे नापिकीचे संकट यंदाही ओढावले आहे.- प्रल्हाद फरकाडे,शेतकरी, गव्हा फरकाडे

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती