तिवसा : एकीकडे नागरिक कोरोनाने हतप्रभ झाले असताना, लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. त्यातच सोयाबीन तेलाचे दर किरकोळ बाजारात १७० रुपये किलोवर पोहोचले आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या तेल व संसारोपयोगी वस्तुंच्या चढ्या दराने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
सोयाबीन तेलाच्या ५ लिटरच्या कॅनसाठी ७६० ते ७८० रुपये व १५ किलोच्या पिंपाचे भाव २५०० रुपयांच्या घरात आहे. गतवर्षी सोयाबीन तेल ८० ते १०० रुपये किलो होते. ते यंदा थेट दुपटीवर पोहोचले आहे. अन्य खाद्यतेलाचे दर उच्चांकी असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक सोयाबीन तेलाला पसंती देतात. मात्र, तेच आता अधिक महागल्याने घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट
कोरोना काळात काम नाही. यात महागाई प्रचंड वाढली आहे. तेलाशिवाय फोडणी शक्य नाही. सरकारने दर नियंत्रित ठेवावे.
- वनिता चौधरी, गृहिणी, तिवसा