लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या विपरित परिस्थितीत शेतकरी संरक्षणात्मक उपाययोजना करू शकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन सद्यस्थितीत बाधित झालेले आहे. या बाधित पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.यंदाच्या खरिपात १० ते २५ जून या कालावधीत सोयाबीनची किमान तीन लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. पाऊसही समाधानकारक असल्याने पिकांची वाढ चांगली झालेली आहे. ‘कॅश क्रॉप’ असल्याने शेतकऱ्यांची पहिली पसंती सोयाबीनला आहे. खरिपाच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत किमान ४५ टक्के क्षेत्रात यंदा सोयाबीन आहे. सद्यस्थितीत पीक फुलोर व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना जुलैच्या अखेरपासून पावसाची रिपरीप सुरू झाली. ती अद्यापही थांबलेली नाही. सतत पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीनवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. फवारणीसाठी शेतकºयांना सवड मिळाली नसल्याने जिल्ह्यातील किमान दीड लाख हेक्टरवरील सोयाबीनवर मुळकूज, खोडकूज, पिवळा मोझैक यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. याशिवाय पानथळ व भारी जमिनीत पाणी साचल्याने सोयाबीन पिवळे पडून सुकायला लागले आहे.सध्या किमान ४४,२७७ हेक्टरमधील पीक बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. अश्या परिस्थितीत सध्याही पाऊस सुरु असल्याने नुकसान क्षेत्रात दिवसेदिवस वाढ होत असल्याने शेतकºयांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.मूग व उडदावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात संयुक्त सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. अशीच स्थिती सर्वच तालुक्यातील सोयाबीन पिकावर ओढावलेली असतांना शासनाने सर्व्हेक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन तालुक्यांमध्ये भेदभाव करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.४४ हजार हेक्टरचा प्राथमिक अहवालढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे सद्यस्थितीत ४४ हजार २७७ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन बाधित झाल्याचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा प्राथमिक अहवाल २५ ऑगस्टला जिल्हा प्रशासनाला सादर झालेला आहे. त्यानंतरही हीच स्थिती कायम आहे. किंबहुना पाऊस वाढल्याने पिकस्थिती चिंताजनक आहे. अश्या परिस्थितीत बाधित क्षेत्रात वाढ होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश द्यावेत, अशी शेतकºयांची मागणी आहे.‘एनडीआरएफ’चा मिळू शकतो लाभस्थानिक नैसर्गीक आपत्ती तसेच पिकांवर कीड व रोगाचा अटॅक यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. केंद्र शासनाचे ३० जून २०१७ चे मार्गदर्शक सुचनांनूसार मुद्दा क्रमांक ३ (१) मध्ये तशी तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या नुकसानीसाठी सर्व्हेक्षण व पंचनाम्याचे आदेश दिल्यास शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सहाय्य होवू शकते. त्याचप्रमाणे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्येही या बाधित क्षेत्राला मिळू शकत असल्याने कृषी विभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.
सोयाबीन बाधित, पंचनामे केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST
यंदाच्या खरिपात १० ते २५ जून या कालावधीत सोयाबीनची किमान तीन लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. पाऊसही समाधानकारक असल्याने पिकांची वाढ चांगली झालेली आहे. ‘कॅश क्रॉप’ असल्याने शेतकऱ्यांची पहिली पसंती सोयाबीनला आहे. खरिपाच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत किमान ४५ टक्के क्षेत्रात यंदा सोयाबीन आहे. सद्यस्थितीत पीक फुलोर व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना जुलैच्या अखेरपासून पावसाची रिपरीप सुरू झाली. ती अद्यापही थांबलेली नाही.
सोयाबीन बाधित, पंचनामे केव्हा?
ठळक मुद्देदीड लाख हेक्टरमध्ये नुकसान : पाऊस, ढगाळ वातावरण, कीड, रोगांचा प्रादुर्भाव