शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर बाजार समितीत सोयाबीन बेभाव

By admin | Updated: October 24, 2016 00:14 IST

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अस्मानी व सुल्तानी संकटाचा भार सोसवत नसल्यामुळे त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

क्विंटलमागे ३०० ग्रॅमची कट्टी : व्यापारी-अडत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची कोंडीपरतवाडा : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अस्मानी व सुल्तानी संकटाचा भार सोसवत नसल्यामुळे त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. मात्र अचलपूर बाजार समितीत अडत्या-व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराने सोयाबीन पडत्या भावाने खरेदी केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे. दिवाळी सण पाहता मोठ्या प्रमाणात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो क्विंटल सोयाबीन येत आहे. अशातच स्थानीय व्यापारी-अडत्यांनी थोड्या ओलसर असलेल्या सोयाबीनच्या प्रति क्वंटलमागे तीनशे ग्रॅम कट्टी कापायला सुरुवात केल्याने कमी दर आणि त्यातही वजनाची कट्टी होत असल्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे चित्र आहे. ही कट्टी बाजार समितीच्या कुठल्याच नियमात बसत नसताना दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सुरू असलेली लुबाडणूक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पोहोचवणारी ठरली आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या कुठल्याच संचालकाने याविरुद्ध आवाज न उठविणे यावरही शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.बेभाव सोयाबीनजिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीत गणना होणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल मातीमोल भावाने खरेदी केल्या जात आहे. शेतमालाचे दर ठरविण्याची पद्धत शासकीयदृष्ट्या नियमबाह्य असून सोळाशे ते दोन हजार ७०० रूपये दरापर्यंत दाताने दाबून प्रतवारी ठरवून सोयाबीन खरेदी केले जात असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)कट्टीत गेले १३ किलो सोयाबीनखरेदीदार व्यापाऱ्यांच्या मनमौजी कारभाराचा फटका सवर शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीन ओलसर असल्याची बतावणी करीत प्रतिक्विंटल मागे तीनशे ग्रॅमची कट्टी कापल्याच्या कारणावरून व्यापारी, अडते आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून येत आहेत. कुष्ठा येथील शेतकरी अविनाश चौधरी यांनी शुक्रवारी बाजार समितीमध्ये ४५ क्विंटल सोयाबीन आणले होते. अशोककुमार जैन यांच्या अडतीवर हे सोयाबीन विकण्यात आले. त्या सोयाबीनमध्ये प्रतिक्विंटल ३०० ग्रॅम कट्टी कापल्याने चौधरी यांचे १३ किलो सोयाबीन अतिरिक्त गेले. याच पद्धतीने गोरगरीब शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे चित्र आहे.दाताने दाबून ठरते प्रतवारीअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीची अद्यावत अशी यंत्रणा नाही. परिणामी कुठल्याच परीभाषेत व नियमबाह्य असलेली पद्धत सर्रासपणे सुरू आहे. सोयाबीनचा दाणा दाताखाली दाबून नंतर खरेदीदार प्रतवारी ठरवत असल्याचे चित्र आहे. यातच दिलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्याला मिळेल त्या भावाने सोयाबीन द्यावे लागत आहे.