शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

आर्द्राच्या उंदरावर पेरणीची मदार

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

कोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही.

पेरणी प्रारंभ : सर्वच तालुक्यांत तुरळक पाऊससचिन सुंदरकर अमरावतीकोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही. मृग नक्षत्र संपला असून मंगळवारपासून आर्द्रान क्षत्राला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पहिल्या पावसावर पेरणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत पाच टक्केपेक्षाही कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात पेरणीचे एकूण क्षेत्रफळ ७ लाख १४ हजार ९५० हेक्टरमध्ये राहणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे.विदर्भात सरासरी ७ जूननंतर मान्सूनचे आगमण होते. परंतु यंदा मान्सून लांबल्याने पेरणीला सुरुवात झाली नाही. मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांत अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. मात्र तुरळक पावसाच्या सरीवर थोडीफार पेरणी केल्या गेली. अद्यापही वातावरणात उकाडा कायम आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने काही ठिकाणी धूळपेरणीला सुरुवात झाली आहे. अमरावती तालुक्यात सोयाबीनचा पेरा ३२ हजार हेक्टर क्षेत्रात राहणार असून कपाशी १०,०००, तूर ११०००, मूग ३००, ज्वारी ५००, उडदाचे क्षेत्रफळ ४०० हेक्टर राहणार आहे. भातकुली तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, कपाशी ७ हजार हेक्टर, तूर १० हजार हेक्टर, मूग २ हजार हेक्टर, ज्वारी ५००, उडदाचा पेरा ५०० हेक्टर क्षेत्रात राहणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, ८ हजार हेक्टरमध्ये कपाशी, १२ हजार हेक्टरमध्ये तूर, १ हजार हेक्टरमध्ये मूग, १ हजार हेक्टरमध्ये उडदाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाद्वारे वर्तनीली गेली आहे. तिवसा तालुक्यात २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, १३ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ६५०० हेक्टर क्षेत्रात तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारीचा पेरा राहणार आहे. चांदूररेल्वे तालुक्यात २२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, ११ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ८ हजार हेक्टरमध्ये तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारी, ८०० हेक्टरमध्ये उडदाचा पेरा होण्याचे प्रस्तावित आहे. तालुक्यात दोन टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्रात पाऊस येऊन तीन वर्षांत प्रथमच पेरणीला सुरुवात झाली. धामणगाव, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा तालुक्यात सोयाबीन, कपाशी आणि तुरीचा पेरा यंदा अधिक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप हंगामात दमदार पाऊस कोसळल्यास याचा फायदा इतर पिकांसह संत्रा पिकाला होणार आहे. वरुड,मोर्शी, शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबाच्या कलम खरेदीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे.