शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सोफियाची पाईपलाईन फुटली, पिंपळखुटा जलमय

By admin | Updated: February 4, 2015 23:05 IST

सोफीया औष्णीक वीज प्रकल्पाची जलवाहिनी फुटल्यामुळे नजीकच्या पिंपळखुटा (मोठा) या गावात पाणी शिरले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. उर्दू शाळेत पाणी शिरल्याने

अनर्थ टळला : शाळा, शेतीची मोठी हानी मोर्शी/तळणी : सोफीया औष्णीक वीज प्रकल्पाची जलवाहिनी फुटल्यामुळे नजीकच्या पिंपळखुटा (मोठा) या गावात पाणी शिरले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. उर्दू शाळेत पाणी शिरल्याने शाळेला सुटी देण्यात आली. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे शेतातील पिकांचीही मोठी हानी झाली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोफियाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. नांदगाव पेठ येथील इंडीया बूल कंपनीच्या सोफीया औष्णीक वीज प्रकल्पाकरिता येथील अप्पर वर्धा धरणातून १२०० मी.मि. व्यासाची ३१ किलोमिटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पिंपळखुटा मोठा या गावानजीकच्या जमिनीखालून ही जलवाहिनी गेली आहे. जलवाहिनीचे संभाव्य धोके ओळखून गावकऱ्यांनी त्यावेळी या जलवाहिनीला विरोध दर्शविला होता. तथापि कंपनीने गावकऱ्यांच्या रोषाला न जुमानता जलवाहिनीचे काम पूर्ण केले. सोफियाविरोधात रोष उफाळलाबुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जि.प. उर्दू शाळेच्या भिंतीशेजारुन गेलेली ही जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे प्रचंड दाबाने पाण्याचे फवारे उडाले. त्यामुळे पिंपळखुटा गावात पाणी शिरले. जि.प. उर्दू शाळा आणि विवेकानंद विद्यामंदिराच्या आवारात व वर्गखोल्यांमध्ये पाणी साचले. यामुळे विद्यार्थी,शिक्षकांची तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांनी शाळेतून पळ काढला. शिक्षकांनी सावधगिरी२ बाळगून शाळेला सुटी दिली.शाळेच्या भांडारगृहातील साहित्य देखील भिजले. जलवाहिनीचे पाणी धो-धो वाहात होते. गावात गोंधळ उडाला. मिळेल त्या साहित्याने पाणी नाल्यात सोडण्यचा प्रयत्न गावकरी करीत होते. त्यात त्यांना बरेचसे यशही आले.हा प्रकार सुरु असताना गावातील नागरिक गजानन चरपे, पोलीस पाटील निकम यांनी सोफियाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी अप्पर वर्धा धरणातून सोडण्यात आलेले पाणी थांबविण्याच्या सूचना तेथील कर्मचाऱ्यांना दिल्या. परंतु तोवर बरीच हानी झाली होती. सिमेंटरस्ताही वाहून गेला २७ मिटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बुधवारपासून सुरु झाले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा रस्ता पूर्णत: वाहून गेला. गावातील डांबरी रस्त्यावरुन पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत गेल्यामुळे रस्ता खरडला गेला तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला.गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !एक महिन्यापूर्वी गावाशेजारुन वाहत असलेल्या नाल्याशेजारी हिच जलवाहिनी फुटली होती. हीच घटना रात्रीला घडली असती तर मोठी जिवीत आणि वित्तहानी घडू शकली असती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. सोफिया देणार नुकसान भरपाई घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना मिळताच त्यांनी तहसीलदार माळवी आणि त्यांच्या अधिनस्थ महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने रवाना केले. त्यांनी सोफीयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीमार्फत करण्याच्या सूचना दिल्या. आमदार अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.