शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

क्वारंटाईन उच्चारताच त्याने ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST

मला येथे ठेवल्यास मी गळफास घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने उपस्थितांना दिली. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईलाही आणण्यात आले. परंतु, मुलाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्याला पकडण्याकरिता उपस्थितांनी धाव घेतली. परंतु काही क्षणात तो दिसेनासा झाला. नजीकच्या ढाकणा येथे सासुरवाडीत जात असल्याचे ओरडत गेला. हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजता घडला. त्यानंतर मंगळवारी पहाटे त्याच्या आईनेही कुणाला न सांगता पोबारा केला.

ठळक मुद्देसेमाडोह येथील प्रकार : आईदेखील रफूचक्कर, जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकारी, डॉक्टरांकरवी केलेली मनधरणी व्यर्थ

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : कोरोनाची लागण असलेल्या यवतमाळ रेड झोन परिसरातून आल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. ताप असल्याने त्याची जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाईन कक्षात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, क्वारंटाईन शब्द उच्चारताच त्याने गर्भीत धमकी देत तेथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी सेमाडोह येथे घडला. पाठोपाठ मंगळवारी त्याची आईसुद्धा तेथून परागंदा झाली.मला येथे ठेवल्यास मी गळफास घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने उपस्थितांना दिली. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईलाही आणण्यात आले. परंतु, मुलाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्याला पकडण्याकरिता उपस्थितांनी धाव घेतली. परंतु काही क्षणात तो दिसेनासा झाला. नजीकच्या ढाकणा येथे सासुरवाडीत जात असल्याचे ओरडत गेला. हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजता घडला. त्यानंतर मंगळवारी पहाटे त्याच्या आईनेही कुणाला न सांगता पोबारा केला. यंत्रणेने माय-लेकाची शोधमोहीम चालविली. मुलताई ढाणा, सेमाडोह येथील मूळ रहिवासी असलेला एक युवक यवतमाळ जिल्ह्यातून सोमवारी दुपारी सेमाडोह येथे दाखल झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी महेश कुर्तकोटी यांनी त्याची तपासणी केली. ताप असल्याचे निदान झाले. उपचारानंतर त्याला जि.प. शाळेत क्वारंटाईनबाबत सुचविले. या वेळी जि.प. सदस्य सुनंदा काकड, सरपंच प्रल्हाद मावस्कर, तलाठी भुसूम, शिवा काकड, संदीप बारवे आणि डॉक्टरांनी त्याची समजूत काढली. परंतु कुणाचे काहीच न ऐकता त्याने जंगलात धूम ठोकली.मुलासह - मातेचा शोध सुरूक्वारंटाईन न होता तेथून जंगलात पळून गेलेल्या त्या तरूणाचा यंत्रणेने ढाकणा येथे त्याच्या सासुरवाडी व परिसरातील गावात शोध चालविला आहे. दुसरीकडे त्याच्या आईचाही आजूबाजूच्या गावात शोध घेणे सुरू आहे.ताप असल्याने त्यांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. परंतु गळफास घेण्याची धमकी देत सोमवारी त्याने पळ काढला. मंगळवारी पहाटे त्याची आई पोबारा झाली. दोघांचाही शोध घेतला जात आहे.- महेश कुर्तकोटी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेमाडोह

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या