शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

मुलगा विहीरीत पडताच वडिलांनाही घेतली विहीरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:13 IST

अमरावती : मोठ्या भावासोबत खेळत असताना अपार्टमेंटमधील विहिरीत साडेचार वर्षाचा मुलगा अचानक पडला. ही माहिती धावत जावून मोठ्या ...

अमरावती : मोठ्या भावासोबत खेळत असताना अपार्टमेंटमधील विहिरीत साडेचार वर्षाचा मुलगा अचानक पडला. ही माहिती धावत जावून मोठ्या मुलाने वडिलांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत उडी घेवून मुलाचा जीव वाचविला. त्यानंतर महापालिकेच्या रेस्क्यु टिमच्या मदतीने मुलाला व वडिलांनी सुखरुप १५ मिनिटाच्या रेसक्यु ऑपरेशननंतर विहिरीबाहेर काढण्यात यश आले. ही हद्‌यद्रावक घटना शेगाव नाका नजीकच्या अभिनव कॉलनीतील साईतिर्थ अपार्टमेंटमध्ये शनिवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

मनिष सोपानराव मानकर (३८, रा. अभिनव कॉलनी) असे या शुर वडिलांचे नाव आहे तर त्यांचा मुलगा मनस्व (साडेचार वर्ष) असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे. मनस्व विहीरीत पडल्याची माहिती त्याचा मोठा भाऊ आर्यनने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फुट खोल विहीरीत उडी घेतली. आधी त्यांना मनस्व दिसून आला नाही. मात्र त्यांनी आरडाओरड करीत खोल पाण्यात पुन्हा डूपकी घेतल्याने मनस्वचा पाय त्यांच्या हातात लागला. त्यानंतर विहीरीत असलेल्या कपराचा आधार घेत मनस्वला मिठीत घेतले. तो पर्यंत विहीरीजवळ अपार्टमेंट मधील नागरिकांनी गर्दी केली होती. वडिल व मुलगा जीवंत आहे किवा नाही? हे कुणालाही कळत नव्हते. याची माहिती तातडीने भ्रमध्वनीवरून माोरे नामक व्यक्तीने महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या रेस्क्यु टिमला दिली. त्यांनीही दोन किंमीचे अंतर पाच मिनिटात गाठून विहीरीत दोरीची सीडी सोडून प्रथम एक जणांना विहीरीत उतरुन प्रथम मुलाल व नंतर वडिलांनी सुरुरुप विहीरी बाहेर काढले. मुलाला आईजवळ दिल्यानंतर तिचा जीव भांड्यात पडला. यावेळी आईचे डोळे पणावले होते. मुलाला जवळच्या फॅमीली डॉक्टरकडे उपचाराकरीता नेण्यात आले होते.

दोघांना वाचविणार्या रेस्क्यु टिममध्ये अभिषेक निंभोरकर, सुरज लोणारे, अमोल सांळूखे, हर्षद दहातोंडे, जयकुमार वानखडे, शुभम जाधव यांचा समावेश होता.