शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक शांतीसाठी संतसाहित्य नवसंजीवनी

By admin | Updated: January 12, 2016 00:12 IST

असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे.

संमेलनाचे सूप वाजले : पुढील आयोजन इंदूरमध्येअमरावती : असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे. देशातील विविध संतांनी जगाला प्रेरक ठरेल, अशी साहित्य निर्मिती केल्याने ते संतसाहित्य जागतिक शांतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचा सूर येथील सर्व संत साहित्य संमेलनातून निघाला. व्यापक प्रतिसाद लाभलेले पहिले अखिल भारतीय सर्व संत साहित्य संमेलनाचे आज सोमवारी सूप वाजले. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात ९ जानेवारीला संत साहित्य संमेलनाची सुरूवात झाली होती. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासकांनी संत साहित्याची गरज प्रतिपादीत केली.२०१६ चे संत साहित्य संमेलन इंदूर येथेपहिल्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचा सोमवारी तिसऱ्या दिवशी समारोप झाला. दुसरे संत साहित्य संमेलन जानेवारी २०१७ मध्ये इंदूरमध्ये होणार असल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्या आयोजनाची जबाबदारी बाबा महाराज तरोळकर, लिला मोरे (इंदूर), मुकुंद डोळे, सुभाष जाऊरकर, बबन मांडवकर यांच्याकडे असल्याची माहिती संमेलनात देण्यात आली. तत्पूर्वी आज सकाळी ‘संत साहित्य दर्शन’ या विषयावर परिसंवाद झाला. यात संत कबीर, महावीर, संत रविदास, सुफी संत, बाबा फरिदी, श्री बसवेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नरसी मेहता आणि संत तुलसी यांचा जीवनप्रवास आणि साहित्यावर संजय धोटे, म्हैसुरचे सुयोग निधीजी, इंदूरच्या लीला मोरे, जुल्फी शेख, सुनंदा जामकर, रमेश खंडारे, श्रीकांत गोंधळेकर, ज्योती मंत्री सहभागी झाले. या मान्यवरांनी देशातील संत साहित्यातील बारकावे आणि त्यातील जीवनमूल्यांचे विवेचन केले.परिसंवादांना व्यापक प्रतिसादअमरावती : दुपारी १ च्या सुमारास अ. भा. महानुभाव साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम नागपुरे, देवळीचे सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल आणि माजी प्राचार्य रमेश हुकूम यांचा सत्कार करण्यात आला. तर येथील अनुभूती पाटील यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ६ च्या सुमारास संत कान्होपात्रा हे नाटक सादर करण्यात आले. ९ आणि १० जानेवारीला झालेल्या संत साहित्य संदर्भात वर्तमान जीवनात संत साहित्याचे औचित्य आणि संत साहित्यातून उलगडणारे स्त्रीमनाचे भावविख या तीनही परिसंवादाला व्यापक प्रेक्षकवर्ग लाभला. ९ जानेवारीला ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या तीन दिवसीय सर्व संत साहित्य संमेलनाचे सोमवारी नाटक सादर करुन सूप वाजले.