शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या भीषण अपघातात आई-वडिलांसह मुलगा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 20:26 IST

उभ्या ट्रॅक्टरला कार धडकल्याने आई-वडिलांसह मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास माहुली जहागीर येथे घडली.

नांदगाव पेठ (अमरावती) : उभ्या ट्रॅक्टरला कार धडकल्याने आई-वडिलांसह मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास माहुली जहागीर येथे घडली. या घटनेत दहा वर्षीय नातू गंभीर जखमी झाला. मृत व जखमी एकाच कुटुंबातील आहेत. वडिलांच्या उपचारासाठी सदर कुटुंब हे कारने अमरावतीला जात असताना माहुली जहागीर गावासमोर एका पुलानजीक ट्रॅक्टरला कार धडकल्याने हा भीषण अपघात झाला.सोमेश प्रभाकर काळबेंडे (२६), प्रभाकर रामचंद्र काळबेंडे (६५), राजमती प्रभाकर काळबेंडे (६२, सर्व रा. गजानन महाराज मंदिरालगत, वरूड), अशी मृतांची नावे आहेत. प्रभाकर काळबेंडे यांचा नातू वरद सुरेंद्र दोंदलकर (१०) हा गंभीर जखमी झाला. त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वडील प्रभाकर काळबेंडे यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जायचे असल्याने सोमेश काळबेंडे हे शनिवारी सकाळी ११ वाजता वरूड येथून एमएच २७ बीझेड ०७०६ या कारने अमरावतीसाठी निघाले. दुपारी १ वाजताच्या सुमारास माहुली जहागीरपुढे एका पुलाजवळ ही भरधाव कार रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. यात कार चालवित असलेला सोमेश व त्यांचे आई-वडील घटनास्थळीच ठार झाले. या भीषण धडकेत कारचा पुढील भाग चकनाचूर झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ते मदतकार्य सुरू केले. माहुली जहागीरचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करून जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथून त्याला त्वरित खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.---------------काळबेंडे दाम्पत्य निवृत्त शिक्षकप्रभाकर काळबेंडे व राजमती काळबेंडे हे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी अनेक वर्षे वरूड येथील न्यू हायस्कूलमध्ये सेवा दिली. अविवाहित असलेला मृत सोमेश हे कृषी संबंधित व्यवसायाशी जुळलेला होता. जखमी वरद हा आजोबा प्रभाकर काळबेंडे यांच्याकडे वरूड येथे शिकायला आहे.  घटनेची माहिती मिळताच वरूडमध्ये एकच शोककळा पसरली. नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करीत आक्रोश केला.