शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कुणाला कानातले, कुणाला बांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:31 PM

लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापायला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झालेली आहे. २९ मार्चला उमेदवारी अर्जाची माघार झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. राष्ट्रीय पक्षांसाठी सात चिन्ह राखीव आहेत, तर अपक्षांना उपलब्ध १९९ निवडणूक चिन्हापैकी एक चिन्ह निवडावे लागेल. यामध्ये बांगडी, कानातले (ईअररिंग), बॉटल, टोपी, नेकलेससह अन्य चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे.

ठळक मुद्देचॉकलेट, अंगठी, भेंडी अन् हिरव्या मिरचीसह १९९ चिन्ह उपलब्धरंजक चिन्हांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापायला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झालेली आहे. २९ मार्चला उमेदवारी अर्जाची माघार झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. राष्ट्रीय पक्षांसाठी सात चिन्ह राखीव आहेत, तर अपक्षांना उपलब्ध १९९ निवडणूक चिन्हापैकी एक चिन्ह निवडावे लागेल. यामध्ये बांगडी, कानातले (ईअररिंग), बॉटल, टोपी, नेकलेससह अन्य चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची २६ मार्च ही डेडलाईन आहे. २९ मार्चला दुपारी तीन वाजेपर्यत उमेदवारी अर्जाची माघार घेता येणार आहे व याच दिवशी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येईल. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, सीपीआय, सीपीएम व बहुजन समाज पार्टी हे राष्ट्रीय पक्ष असल्याने यांचे निवडणूक चिन्ह राखीव आहेत. तर शिवसेना व भारीप बहुजन महासंघ हे प्रादेशिक पक्ष असल्याने त्यांनाही त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळते. याव्यतिरिक्त अपक्षांसाठी १९९ निवडणूक चिन्ह हे राखीव आहेत. यामध्ये ३६ चिन्ह हे नव्याने समाविष्ट झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी दिली.आयोगाचे २० जून २०१८ चे अधिसुचनेप्रमाणे एअर कंडीशनर, कपाट, आॅटो रिक्षा, बेबी वॉकर, बलून, फळांची टोपली, बॅट, बॅट्समन, बॅटरी टॉर्च, मन्यांचा नेकलेस, बेल्ट, बेंच, सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप, दुर्बिण, बिस्कीट, ब्लॅक बोर्ड, जहाज, बॉटल, बॉक्स, ब्रेड, विट, ब्रिफकेस, ब्रश, बकेट, कॅन, कारपेट, कॅरम बोर्ड, चेन, चक्की, चपाती रोलर, चेस बोर्ड, कोट, नारळाची बाग, कलर ट्रे आणि ब्रश आदी चिन्हाचा समावेश आहे.नव्या चिन्हात सीसीटीव्ही अन् कॉम्प्युटरआयोगाने नव्याने ३६ चिन्हाचा यामध्ये समावेश केला आहे. यामध्ये सफरचंद, हेलिकॉप्टर, शिट्टी वाजविणारा माणूस, ब्रेड टोस्टर, सीसीटीव्ही, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर माऊस, डोअर बेल, कानातले, फुटबॉल, अद्रक, पर्स, कार्ट, ग्लॉस, कॅटली, शिंक, फुटबॉल प्लेयर, लॅपटॉप, लुडो, पेनड्राइव्ह, रिमोट, रबरस्टॅम्प, जहाज, सितार, शटर, सोफा, स्पॅनर, स्टंप, स्विचबोर्ड, चिमटा, ट्युबलाईट या चिन्हांचा यामध्ये समावेश आहे.फुलकोबी, हिरवी मिरची अन् शेंगदानेहीबांगड्या, मन्यांचा नेकलेस, शिसी, ब्रेड, फुलकोबी, चप्पल, चिमणी, पेट्रोल पंप, डिझेल पंप, डिश अ‍ॅटेना, डोली, फ्राक, द्राक्ष, हिरवी मिरची, हेडफोन, हॉकी आणि बॉल, आईसक्रिम, शेंगदाने, मोती, मटार, फोन चार्जर, रेझर, सेफ्टी पिन यासह अनेक मजेदार चिन्ह यावेळी अपक्ष उमेदवारांसाठी असणार आहे.