लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील पंचवटी चौकात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक शिपायाच्या विनंतीवरून संचारबंदीच्या काळात रुग्ण महिला व तिच्या मुलीला आरोग्य सेवेतील महिलेकडून स्वत:च्या वाहनातून सुखरूपपणे घरी पोहचविण्यात आले. किंबहुना या महिलेनेसुद्धा आरोग्यसेवेसोबत सामाजिक बांधीलकी जोपासल्याचे वास्तव बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अनुभवता आहे. सदर रुग्ण महिला साईनगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात रस्त्यांवर प्रवासी वाहने नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय स्मृती महाविद्यालयातून सुटू मिळालेल्या महिलेपुढे पेच निर्माण झाला. ती मुलीसोबत पायी पंचवटी चौकापर्यंत आली. येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शिपायाला घरी जाण्यासाठी व्यवस्था करा, अशी विनवणी केली. यादरम्यान चारचाकी वाहनाने आरोग्य सेवेतील एक महिला कर्तव्य आटोपून जात होता. वाहतूक शिपायाने वाहन थांबविले. राजापेठला जाणाऱ्या या महिलेने वाहतूक शिपायाच्या विनंतीला होकार दर्शवून रुग्ण महिला व मुलीला साईनगर येथे घरी पोहचविले. या प्रकरणात वाहतूक शिपायाने आपले कर्तव्य बजावले, तर आरोग्य सेवेत कार्यरत अनाम महिलेने सामाजिक बांधिलकी जोपासली.
आरोग्य सेवेतील महिलेने जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात रस्त्यांवर प्रवासी वाहने नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय स्मृती महाविद्यालयातून सुटू मिळालेल्या महिलेपुढे पेच निर्माण झाला. ती मुलीसोबत पायी पंचवटी चौकापर्यंत आली. येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शिपायाला घरी जाण्यासाठी व्यवस्था करा, अशी विनवणी केली.
आरोग्य सेवेतील महिलेने जोपासली सामाजिक बांधिलकी
ठळक मुद्देरुग्णाला मुलीसह वाहनाने पोहचविले घरी : पंचवटी चौकातील वाहतूक शिपायाचे सहकार्य