शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

संत्र्यांच्या आड सागवान तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:22 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : संत्रा लाकडाच्या नावे मेळघाटातून सागवानची तस्करी होत आहे. मध्यप्रदेशच्या सीमेतून बहिरम, परतवाडा, ब्राम्हणवाडा गोंविदपूर, चांदूरबाजारमार्गे अमरावतीत चोरीचे सागवान आणले जात आहे. वलगाव मार्गालगतच्या जमील कॉलनीत सागवान तस्करीचे लाकूड साठविले जात असून परतवाडा, घाटलाडकी व अमरावती, असे सागवान चोरीचे कनेक्शन असल्याचे सूत्रांनी सांगितले.सागवान चोरीसाठी तस्करांनी वेगळी शक्कल लढविली ...

ठळक मुद्देजमील कॉलनीत होतेय फस्त?: परतवाडा, ब्राम्हणवाडा, चांदूरबाजारमार्गे चोरी

आॅनलाईन लोकमतअमरावती : संत्रा लाकडाच्या नावे मेळघाटातून सागवानची तस्करी होत आहे. मध्यप्रदेशच्या सीमेतून बहिरम, परतवाडा, ब्राम्हणवाडा गोंविदपूर, चांदूरबाजारमार्गे अमरावतीत चोरीचे सागवान आणले जात आहे. वलगाव मार्गालगतच्या जमील कॉलनीत सागवान तस्करीचे लाकूड साठविले जात असून परतवाडा, घाटलाडकी व अमरावती, असे सागवान चोरीचे कनेक्शन असल्याचे सूत्रांनी सांगितले.सागवान चोरीसाठी तस्करांनी वेगळी शक्कल लढविली असून, ते वाहनात संत्रापेटी, तणस किंवा लाकूड आणण्याचा देखावा करतात. परंतु, वाहनाच्या आतमध्ये मेळघाटातून चोरट्या मार्गाने आणलेले सागवान लाकडाच्या चौकटी राहतात. सागवान तस्करीत काही वनाधिकारीदेखील सामील आहेत. मात्र, सागवान तस्करांसोबत विशिष्ट वनाधिकाºयांचे मधुर संबंध असल्याने गत काही वर्षांपासून सागवान तस्करीचा प्रवास अविरतपणे सुरू असल्याची माहिती आहे. मेळघाटातून चोरट्या मार्गाने आणले जाणारे सागवान लाकूड अमरावती येथील काही आरागिरण्यांमध्ये पोहोचविले जाते.वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्षहा व्यवहार रात्रीलाच होत असल्याचे सांगण्यात आले. ३ ते ५ फू ट आकाराची सागवान चौकट बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत असल्याने बहुतांश आरागिरणी संचालक जमील कॉलनी येथून खरेदी करतात. चोरीचे सागवान लाकूड हे नियमानुसार आणले असल्याचे दाखविण्यासाठी परवाना असलेल्या सागवान लाकडात ते रूपातंरित करतात. रात्री आणि सकाळच्या सुमारास चोरीचे सागवान चौकटीचा व्यवहार होत असल्याने शहरातील आरागिरण्यांमध्ये सारे काही आॅलवेल असल्याचा देखावा सुरू आहे. मेळघाटातून जमील कॉलनीत निरंकुशपणे चोरीचे सागवान लाकूड आणले जात असताना वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.जमील कॉलनीत उत्तरेकडील गोदाम कुणाचे?स्थानिक जमील कॉलनीत सागवान तस्करीचे लाकूड साठवून ठेवण्यासाठी मोठे गोदाम निर्माण करण्यात आले आहे. विशिष्ट समुदायाचे हे गोदाम उत्तरेकडील भागात आहे. विनापरवाना लाकूडसाठा येथे येथे करण्यात आला आहे. मात्र, या गोदामाची तपासणी वनविभाग किंवा पोलीस प्रशासनाने केली नाही, असे सूत्रांनी सांगितले.मेळघाटातून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील आरागिरण्यांची तपासणी केली जाईल. गोदामांची शोधमोहीम राबविताना नियमबाह्य लाकूड आढळल्यास कायदेशीर कारवाई करू.- हेमंत मीणा,उपवनसंरक्षक, अमरावती