रविनगरात चालल्या तलवारी : विद्युत प्रवाहाच्या झटक्याने बालकाचा मृत्यूअमरावती : होळी सण साजरा करताना धुळवडीला किरकोळ घटनांमुळे गालबोल लागले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे अधिकांश परिसरात शांततेत रंगपचमी पार पडली. मात्र, रविनगरात सरकार गँगमधील तरुणांनी तलवार चालविल्याने एक पोलीस जखमी झाले. बेलपुऱ्यातील १३ वर्षीय बालकाचा वीजप्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. याव्यतिरिक्त आठ ते दहा किरकोळ अपघातासह मारहाणीच्या काही घटना घडल्या आहेत. दरवर्षी होळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचतो. विविध परिसरात वादविवाद किंवा मारहाणीचे प्रकार घडतात. गतवर्षी रंगपंचमीला एकाची हत्या झाली करण्यात आली होती. त्यातुलनेत यंदा गुन्हेगारीच्या घटना कमी घडल्या. सोमवारी रविनगर परिसरातील छत्रपती प्रांगणात काही नागरिक व महिला रंगपंचमी खेळत होत्या. दरम्यान शेजारच्या परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी रंगपंचमीत हस्तक्षेप करून टवाळखोरी सुरू केली. ही बाब निदर्शनास येताच रविनगरातील रहिवासी व पोलीस विभागात कार्यरत राजेश घुले यांनी त्या तरुणांना हटकले. मात्र, एका अल्पवयीन मुलाने चक्क राजेश घुलेवर हल्ला करण्यासाठी तलवार आणली. त्याच्या साथीदारांनी ती तलवार हाती घेऊन राजेश घुले यांच्यावर हल्ला चढविला. हल्ल्यानंतर काही आरोपींनी दगडफेक केली आणि घुले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात राजेश घुले जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांना घटनास्थळ गाठून स्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अल्पवयीनास ताब्यात घेतले. अन्य आरोपी पसार झाले. या प्रकरणात राजेश घुले यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ऋषी उंबरकर, सुनील शुक्ला, बाबू नळे, महेश पळसकर व सूरज रघुवंशीविरुद्ध े शहरातील अन्य काही ठिकाणी रंगपंचमीला किरकोळ घटना घडल्या.भटवाडीत तलवारीची दहशततलवार हाती घेऊन सार्वजनिक रस्त्यावर धुमाकुळ घालणाऱ्या काही तरुणांना राजापेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी भटवाडीतून अटक केली. रुपेश सुभाष चरपे, रवींद्र साहेब इंगोले, गोला चरपे अशी आरोपींची नावे आहेत.कांतानगर, महाजनपुरा भागात डीजेवर कारवाईविनापरवानगी डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध सोमवारी गाडगेनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी उमेश मधुकर यावले, संतोष मधुकर राऊतविरुद्ध गुन्हा नोंदविला. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाजन पुऱ्यात विनापरवाना कर्कश आवाजात डीजे वाचविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. यात विजयकर कुटुंबीयांतील १० जणांसह सागर सावरकर यांचा सहभाग आहे. सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळनांदगाव पेठ येथील शासकीय वसाहतीतील सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. शांतता भंग करून आरोपी एकमेकांना मारहाण करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणात पोलिसांनी धर्मेन्द्र पांडे, वासीम शाबीर शाहविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अल्पवयीनास मारहाणकोतवाली ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौकात विशेष समुदायातील एका अल्पवयीन मुलाला दोन जणांनी मारहाण केली. क्रिक्रेट खेळताना अंगावर फुगा फुटल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला होता. यामध्ये आरोपी युवकांनी एका १५ वर्षीय अल्पवयीनास शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. अवैध दारू विके्रत्यावर कारवाई रंगपंचमीला ड्राय डे च्या दिवशी काही ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री सुरु होती. यामध्ये गाडगेनगर पोलिसांनी मांडवा झोपडपट्टी भागात धाड टाकून आरोपी विजय भाऊ मसराम व दशरथ दादाराव काळे यांच्याकडून दारूचा मुद्देमाल जप्त केला. नांदगाव पेठ पोलिसांनी रहाटगाव परिसरात धाड टाकून अनूप गजानन देशमुखकडून दारूचा माल जप्त केला.
किरकोळ घटनांमुळे धुळवडीला गालबोट
By admin | Updated: March 15, 2017 00:06 IST