तीन कुटुंब उघडयावर : वरुड तालुक्यातील सुरळी येथील घटनासंजय खासबागे वरूडआयुष्यात प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतो. यातून काही बचत झाल्यास कुटुंबासाठी काहीतरी करतो. तळहातावरचे जिणे जगताना तालुक्यातील राऊत कुटुंबाने अत्यंत कष्टाने बकरीपालन केले. पुनर्वसन भागातील घरात आपला संसार थाटला. गुरुवारच्या बाजारात बकऱ्या विकून घरात काहीतरी नवीन घ्यावे म्हणून २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. यातून धान्य विकत आणल्यास काही रोख रक्कम चरितार्थासाठी ठेवली. काही दिवसांनी कुटुंबाची परिस्थीती रुळावर आली होती. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. २२ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीत डोळयादेखत १५ बकरीची पिल्ले बेचिराख झाली. घरातील साहित्याची राखरांगोळी झाली अन् क्षणार्धात राऊत कुटुंबाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. राऊत आणि पवार कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले. शासन व सेवाभावी संस्थानी तात्पुरती मदत केली. मात्र, त्यांच्या निवाऱ्याचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.आयुष्य हे क्षणभंगूर असते. हे माहिती असतांना अनेकांना कुटुंबासाठी काही करण्याचा हव्यास असतो. मोलमजुरी करुन आपणही चांगले जीवन जगावे, असे प्रत्येकाला वाटते. कष्ट करुन बकरी पालन आणि मोलमजुरी केली. यातून बचत करुन बकऱ्या तयार झाल्या. घरात काही सुखसुविधा असाव्या म्हणून राऊत परिवाराने एक दिवसांपूर्वीच बकऱ्या विकून २० हजार रुपये मिळाले. काल २२ ला दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान अचानक घराला आग लागली आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग शेजारच्या रवींंद्र पवार आणि भागवत पवार यांच्या घरापर्यंत पोहचली. आगीत सर्वकाही संपले. विलास महादेव राऊत यांच्या मालकीचे १५ बकरीचे पिलांचा मृत्यू झाला. कालच विलास राउत यांनी राजुराबाजारात २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. मिळालेल्या पैशातून धान्य खरेदी केले. तर पैसा जमवून राउत यांच्या पत्नीने सोन्याचे मंगळसूत्र तयार केले होते. ते सुध्दा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने राऊत यांचा संसारच उघडयावर आला. या परिवाराला आता कोण सावरणार?, असा सवाल उपस्थित झाला आहे.
क्षणार्धात झाला त्यांच्या स्वप्नांचा चुराडा
By admin | Updated: April 28, 2016 00:10 IST