शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा, आठवड्यात १० दलघमीने घट

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

जून ते सप्टेंबर १५ दरम्यान जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. तूर्तास जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे.

प्रदीप भाकरे अमरावतीजून ते सप्टेंबर १५ दरम्यान जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. तूर्तास जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पांची प्रकल्पीय जलक्षमता १६७.४६ दलघमी असताना २१ एप्रिल अखेर या प्रकल्पात केवळ ३०.८३ दलघमी (१८.४१ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. दर आठवड्याला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात सरासरी ७ ते १० दशलक्ष घनमीटरची घसरण होत आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना अनेक भागात पाणी टंचाईची धग जाणवत आहे. नदीनाले व विहिरी सुकू लागल्या आहेत. याशिवाय भूजल पातळीत कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात २१ एप्रिलअखेर सरासरी २४४.५७ दलघमी (२७.३९ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. २०१५ साली एप्रिल महिन्यात हाच जलसाठा ३५२.६५ दलघमी होता. तर २०१४ साली ३८६.४९ दलघमी असा उच्चांकी होता. मागील ७ दिवसात जिल्ह्यातील ८० प्रकल्पांमधील जलसाठ्यात सरासरी ११ दशलक्ष घनमीटरने घसरण झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असताना पेयजलाच्या मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ८० सिंचन प्रकल्पाची एकूण प्रकल्पीय क्षमता ८९२.७७ दलघमी असताना तुर्तास या प्रकल्पात २४४.५७ दलघमी पाणी शिल्लक आहे. मेळघाट भागात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. चिखलदऱ्यातील खडीमल, पाचडोंगरी, कोयलारी, मोथाखेडा, आवागड, तारूबांदा, कुलंगणा, भार्द्रा, ढोमणबढी, कालापाणी, पस्तलाई येथे टँकरने पेयजलाचा पुरवठा केला जात आहे. एप्रिलअखेर त्यात मोठी वाढ होणार आहे. याशिवाय वरुड व अन्य काही तालुक्यातील गावांमध्ये पेयजलाचे संकट उद्भवले आहे. (प्रतिनिधी)पूर्णा प्रकल्पात लघुत्तम साठाजिल्ह्यासाठी वरददायिनी ठरलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पात २१ एप्रिलअखेर १४७.९१ दलघमी (२६.२२ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. शहानूरमध्ये २१.१८ दलघमी (४६ टक्के), चंद्रभागा मध्यम प्रकल्पामध्ये १६.८३ दलघमी (४०.८० टक्के), पूर्णा प्रकल्पात ९.१० दलघमी (२५.७३ टक्के) व सपन प्रकल्पात १८.७२ अर्थात ४८.५० टक्के जलसाठा आहे.