शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘उपाय छोटे, फायदे मोठे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:49 IST

बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत.

ठळक मुद्देसी.डी. मायी : कृषी महाविद्यालयात बोंडअळी नियंत्रणावर कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतअमरावती : बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतशिवार कपाशीमुक्त करा, याशिवाय सुचविलेल्या दशसूत्रीचा वापर करा, असे आवाहन नवी दिल्लीच्या ‘एएसआरबी’चे माजी अध्यक्ष व बोंडअळी नियंत्रण अभियानाचे अध्यक्ष डॉ. सी.डी मायी यांनी केले.येतील श्री शिवाजी कृषी महाविद्यालय व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित बोंडअळी नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्र्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य नंदकिशोर तिखिले, पीकेव्हीच्या निम्न कृषी शिक्षणाचे विभागाचे अधिष्ठाता डी.बी. उंदीरवाडे, विस्तार व शिक्षण विभागाचे संचालक डी.एम. मानकर, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते.इंडियन सोसायटी फॉर कॉटन इंम्प्रुव्हमेंट, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर व अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनद्वारा गुलाबी बोंडअळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी भितीपत्रकाच्या सहाय्याने जनजागृती व्हावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले. बोंडअळी नियंत्रनासाठी बाजार समित्या, कॉटन मिलमध्ये कामगंध व प्रकाश सापळे लावा, जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्या, मान्सून पावसावर नवीन लागवड करा, पूर्वहंगामी कपाशी लावू नका आदी उपाययोजना सुचवित बोंडअळीवर नियंत्रण सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन समीर लांडे आभार प्रमोद देशमुख यांनी मानले.बोंडअळी नियंत्रणासाठी हे महत्त्वाचेबोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य आहे, यासाठी १४० ते १६० दिवसांत येणारे वाण निवडा व बीटी कपाशीसोबत रेफ्युजी पिकांचा पेरा करा, कपाशीभोवती सापळा पीक म्हणून एखादी ओळ भेंडीची लावा, आॅगस्टपासून पिकात कामगंध सापळे लावा, गरजेनुसार फवारणी करा, कीटकनाशके, संजिवकांचे मिश्रण करून फवारणी टाळावी उपाययोजना गावपातळीवर एकाचवेळी योजल्यास बोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य असल्याचे मायी यांनी सांगितले.