शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

मोर्शीत नाफेडकडून तूर खरेदी संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:27 IST

नाफेडने मोर्शी तालुक्यातील ५२३ शेतकऱ्यांची केवळ ७६३१ क्विंटल तूर खरेदी केली आहे. दरदिवशी ३६३ क्विंटल तूर खरेदी केली जात आहे.

आॅनलाईन लोकमतमोर्शी : नाफेडने मोर्शी तालुक्यातील ५२३ शेतकऱ्यांची केवळ ७६३१ क्विंटल तूर खरेदी केली आहे. दरदिवशी ३६३ क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरेदीचा हा आकडा निम्मा असून, १८ एप्रिलपर्यंत नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांची तूर शासन मोजणार की नाही, याबाबत शंका आहे.खरेदी-विक्री संघाकडे ३ मार्चपर्यंत ३०९१ शेतकऱ्यांची आॅफलाइन नोंदणी झाली. आॅनलाइन नोंदणीचा आकडा १००० ते ११०० च्या घरात आहे. खरेदी-विक्रीकडून रोज फोनवर ५० शेतकऱ्यांना फोनवर बोलविले जाते. प्रत्यक्ष केंद्रावर १५ ते २० शेतकरी मोजणीसाठी तूर आणत असल्याचे चित्र आहे.सहायक निबंधक एस.टी. केदार यांनी ३ मार्च रोजी नाफेड तूर खरेदीची पाहणी करून आॅनलाइन नोंदणीसाठी संगणक तसेच खरेदीची गती वाढविण्यास खरेदी-विक्री संघाला सांगितले. यावेळी कृषिउत्पन्न बाजार समिती सचिव लाभेश लिखितकर तसेच नाफेड ग्रेडर प्रशांत हिवसे, विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन प्रतिनिधी नंदकिशोर मेघळ, खरेदी-विक्री प्रतिनिधी वासुदेव ठोंबरे, वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी उपस्थित होते.यानंतरही स्थिती सुधारली नसल्याचे गुरुवार, ८ मार्च रोजी निदर्शनास आले. खरेदी-विक्री संघातर्फे अफरातफर व गैरव्यवहाराची त्वरित चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराच शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांना दिला. यावेळी भाजप नगरसेवक सुनील ढोले, दीपक नेवारे, सतीश लेकुरवाळे, सुधीर बेले, सुभाष डोंगरे, संजय लेकुरवाळे, मधुकर लेकुरवाळे, धीरज शिरभाते, नीलेश महल्ले, अशोक खवले, सुनीता मसराम, ईश्वर श्रीसाठ, उमेश जौंजाळकर आदी उपस्थित होते.दोन महिन्यांपासून २३९ व्या क्रमांकाची प्रतीक्षामोर्शी येथील शेतकरी देवराव ढोले यांनी १७ जानेवारीला खरेदी-विक्री संघात २३९ क्रमांकावर रीतसर नोंद केली. दोन महिने होत असतानाही त्यांचा नंबर लागलेला नाही. याबाबत विचारणा केली असता, त्यांचा सातबारा गहाळ झाल्याचे आता कळविण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी तालुक्यातील हिवरखेड, अंबाडा, पाळा येथील शेतकºयांचीसुद्धा आहेत.