शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

निस्तेज समाजमन अन् प्रतीक्षाच्या आर्त किंकाळ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:04 IST

भरदिवसा, भर चौकात राहुल भड हा पत्नी प्रतीक्षाच्या शरीरात चाकू भोसकत होता. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर बघ्यांनी तिकडे धाव घेतली.

ठळक मुद्देश्वेता बायस्करची धावपळ निष्फळ : नांदण्यास तयार नसलेल्या पत्नीचे हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरदिवसा, भर चौकात राहुल भड हा पत्नी प्रतीक्षाच्या शरीरात चाकू भोसकत होता. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर बघ्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत तिची मैत्रिण श्वेताच एकटी तिला मदत मिळवून देण्यासाठी धडपडत होती.साईनगरातील वृंदावन कॉलनी ही बºयापैकी वर्दळ असलेली. त्यामुळे येथे मदतीसाठी कुणीच कसे धावून आले नाही, ही चर्चा घटनेनंतर प्रत्येकाच्या ओठी आहे. प्रतीक्षाच्या आर्त किंकाळ्या व मैत्रीण श्वेता बायस्करची मदतीसाठी आर्त हाक समाजमन केवळ ऐकत होता. मात्र, मदतीसाठी धावून जाण्याचे धाडसच कुणाला झाले नाही. श्वेतानेच तिच्या परिचयातील राजेंद्र येते यांच्याकडून मदत मिळाविली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतीक्षाला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात आणले. मात्र, काळ आला होताच. यामुळे श्वेताची धावपळ निष्फळ ठरली.प्रतीक्षा मेहेत्रे व श्वेता बायस्कर या दोघी समवयस्क. छाबडा प्लॉटमध्ये शेजारीच राहतात. दर गुरुवारी दोघीही वृंदावन कॉलनी स्थित ओंकार मंदिरात दर्शनाला जायच्या.कदाचित ती वाचली असतीअमरावती : २४ नोव्हेंबरचा दिवस प्रतीक्षासाठी काळ बनून येणार असल्याची कल्पनाही त्यांना नव्हती. प्रतीक्षा व श्वेता मंदिरातून दर्शन करून परत घरी जात होत्या. प्रतीक्षा तिची मोपेड चालवित होती, तर श्वेता मागे बसली होती. अचानक वृंदावन कॉलनीतील एका चौकात राहुल भड मागून आला आणि त्याने प्रतीक्षाच्या गाडीला लाथ मारली. त्यामुळे तिने गाडी थांबवून जाब विचारला. दोघांमध्ये दोन ते पाच मिनिटे बाचाबाची झाली. अचानक राहुलने प्रतीक्षावर चाकूने वार केले. एकीकडे प्रतीक्षाच्या किंकाळ्या, तर दुसरीकडे मदतीसाठी श्वेता आर्त हाक देत होती. मदतीला कोणीचा धावून येत नसल्याचे पाहून श्वेताही घाबरली होती. मात्र, मैत्रिणीचा जीव वाचविण्यासाठी काही करावे लागेल, हे तिला उमजले. तिने तत्काळ मंदिराकडे धाव घेऊन राजेंद्र येते यांना मदतीसाठी हाक दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ प्रतीक्षाला रुग्णालयात नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू केली. एका परिचिताची कार तेथून जात होती. येते यांनी मदत मागितली आणि श्वेता व एका महिला डॉक्टरच्या मदतीने प्रतीक्षाला कारमध्ये टाकून इर्विन रुग्णालयात आणले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला होता. प्रतीक्षाला मदत करणाºया श्वेताला उपस्थित नागरिकांनी मदत केली असती, तर कदाचित एक जीव वाचला असता. मात्र, तसे झाले नाही.

टॅग्स :Murderखून