शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटसह सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा,टीएसने वाघांच्या संरक्षणाबाबत केले शिक्कामोर्तब

By गणेश वासनिक | Updated: March 26, 2023 17:18 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही उपलब्धी सन्मानजनक मानली जात आहे. 

अमरावती : कंझर्व्हेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स (सीए/टीएस) या सर्वोच्च जागतिक व्याघ्र मानक संस्थेने वाघांच्या संवर्धनासाठी मेळघाटसह देशभरातील सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही उपलब्धी सन्मानजनक मानली जात आहे. 

सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र), पेरियार राष्ट्रीय उद्यान (केरळ), काली टायगर रिझर्व्ह (कर्नाटक), पिलीभीत व्याघ्र प्रकल्प (उत्तरप्रदेश), ताडोबा-अंधारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र) समावेश आहे. सीए/ टीएस या संस्थेने वाघांचे संरक्षण, अधिवासात वाढ आणि पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घेतल्यामुळेच येथे व्याघ्र संख्या वाढल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. स्वित्झरलॅंड येथील सीए/ टीएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने वाघांच्या संरक्षणाबाबत सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केल्याबाबतचे पत्र केंद्रीय वने, पर्यावरण मंत्रालयाने २४ मार्च २०२३ रोजी जारी केले आहे. जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण व्हावे, संख्या वाढावी आणि पर्यावरण संतुलित राहावे, यासाठी कार्यरत सीए/ टीएस या जागतिक दर्जाच्या मान्यताप्राप्त संस्थेने मेळघाटसह देशातील सहा व्याघ्र प्रकल्पाचा समावेश केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षाकडे वाटचाल सुरू झाली असून, त्याचा समावेश होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. विशेषत: या व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र वजा निमंत्रण दिले आहे.  - नवनीत राणा, खासदार, अमरावती

मेळघाटची जागतिक स्तरावर भरारी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहे. आता सुवर्ण महोत्सवी वर्षात मेळघाट व्याघ्र प्रकल्पास वाघांचे संरक्षण, संवर्धानासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता प्राप्त होणे म्हणजे मेळघाटने जागतिक स्तरावर भरारी घेतल्याचे मानले जात आहे. या उपलब्धीबाबत खासदार नवनीत राणा यांनी केंद्र सरकारने आभार मानले आहे.