शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एसआयटीचे पुनर्गठण, बीटीचे अवैध उत्पादन, विक्रीची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:25 IST

बीटी कपाशी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील (ट्रास्जेस्टिक हर्बिसाइड ग्लायकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैधपणे बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब  निदर्शनास आल्याने चौकशीसाठी शासनाने ७ फेब्रुवारीला दोन सदस्यीय विशेष तपास पथकाचे (एसआयटी) गठण केले.

अमरावती : बीटी कपाशी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील (ट्रास्जेस्टिक हर्बिसाइड ग्लायकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैधपणे बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब  निदर्शनास आल्याने चौकशीसाठी शासनाने ७ फेब्रुवारीला दोन सदस्यीय विशेष तपास पथकाचे (एसआयटी) गठण केले. मात्र, अध्यक्षपदी नियुक्त राज्य गुप्त वार्ता विभागाचे अध्यक्ष संजय बर्वे यांच्याऐवजी आता विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे समितीचे सदस्य सचिव आहेत. बीटी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील जनुकांचा वापर करून अनेक कंपन्याद्वारा बियाण्यांचे उत्पादन व विक्री होत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या तसेच नागपूरच्या ‘सीआयसीआर’  या केंद्राच्या संस्थेकडून प्राप्त अहवालानुसार जादू, एटीएम, बलभद्र, अर्जुन व कृष्णा गोल्ड या बियाण्यांमध्ये हे जनुक आढळून आले आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. अशाच प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यात अनधिकृतपणे होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. यासंदर्भात २५ आॅक्टोबरला नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे ‘एफआयआर’देखील दाखल झालेला आहे. अशाप्रकारे बियाण्यांचे उत्पादन करणारी टोळीच अनेक राज्यात कार्यरत आहे. याच्या चौकशीसाठी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी १३ आॅक्टोबर २०१७ ला केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनानेदेखील स्वतंत्र तपासासाठी आता विशेष तपास समितीचे गठण करून एक महिन्याच्या आत अहवाल मागविला आहे.

कंपण्यावर कारवाईसाठी करणार शिफारसमोन्सँटो, महिको व मोन्सँटो होल्डिंग्ज या बियाणे कंपन्या व काही अनधिकृत कंपन्या विनापरवाना जनुक वापरून महाराष्ट्रात अनधिकृतपणे उत्पादन, साठवणूूक व विक्री यामधील सहभाग व भुमिकेची चौकशी करणे, याप्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाला शिफारस करणे, दाखल गुन्हासंदर्भात कागदपत्राची चाचणी करून अहवाल सादर करणे, बियाण्यांच्या अवैध विक्रीसाठी कारणीभूत बाबी निश्चित करून प्रतिबंधात्मक शिफारस देणे व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिफारसी करून शासनाला एक महिन्याच्या आत अहवाल देणे आदी समितीची कार्यकक्षा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती