शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

लहान भावाची हत्या करणाऱ्या ‘त्या’ बहिणीला १३ पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 19:27 IST

१० वर्षीय अल्पवयीन भावाचा बत्त्याने ठेचून खून करणाºया ऐश्वर्या (बदललेले नाव) न्यायालयाने शनिवारी १३ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती खोलापुरीगेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी लोकमतला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १० वर्षीय अल्पवयीन भावाचा बत्त्याने ठेचून खून करणाऱ्या ऐश्वर्या (बदललेले नाव) न्यायालयाने शनिवारी १३ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती खोलापुरीगेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी लोकमतला दिली.भावाला कायमचे संपविल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे तिथेच सोडून दुसरे कपडे परिधान करून ऐश्वर्या घरातून निघून गेली. दिवसभर सैरभैर फिरल्यानंतर रात्री ती अकोली गावाजवळील एका मंदिराजवळ बसली. माझे घरी भांडण झाले आहे. मला रात्रभर थांबू द्या, असे एका दामपत्याला सांगून नजीकच्या एका फ्लॅटमध्ये तिने गुरुवारी रात्री आश्रय घेतला. या मुलीने लहानग्या भावाचा खून केला, याची त्या दाम्पत्याला कल्पना नव्हती. शुक्रवारी सकाळीच ती मुलगी तेथून निघून गेली.

सकाळी ११.३० वाजता पोलिसांनी सराफा बाजारातून तिला अटक केली. ज्यांच्याकडे ती रात्रभर थांबली होती, त्या ठिकाणी पोलिसांनी ऐश्वर्याला शुक्रवारी रात्री चौकशीकरिता नेले होते. त्या पती-पत्नीचे बयाण पोलिसांनी नोंदविल्याची माहितीसुद्धा ठाणेदार घारपांडे यांनी दिली. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान संतोष (बदललेले नाव) याच्या खून प्रकरणातील आणखी सत्य बाहेर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.अकोली गावाजवळील ज्या फ्लॅटमध्ये सदर मुलगी रात्रभर थांबली होती, त्या फ्लटमधील रहिवासी पती-पत्नीचे बयाण नोंदविले आहे. न्यायालयाने आरोपी मुलीला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अतुल घारपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोलापुरीगेटकाय आहे ही घटना?घराबाहेर जाऊ देत नाही या कारणासाठी मोठ्या बहिणीने लहान भावावर बत्त्याचे अनेक वार करून त्याला ठार केल्याची घटना खोलापुरी गेट येथे घडली होती. आपले आईवडील आपल्यापेक्षा लहान भावावरच जास्त प्रेम करतात असे तिला नेहमी वाटत असायचे. तसे ती बोलूनही दाखवत असे व त्याविरुद्ध रोषही व्यक्त करत असे. मात्र तिच्या या बोलण्याकडे आईवडिलांनी फार गंभीरतेने विचार केला नाही.तिच्या या रागापायी तिने याआधीही घर सोडून जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते. आठच दिवसांआधी तिला पोलिसांनी घरी आणून सोडले होते. त्यामुळे त्यावर कायमची देखरेख ठेवली जात होती.

गुरुवारी तिचे आईवडिल दोघेही घरी नसताना तिने पुन्हा घर सोडण्याचा निर्धार केला व बॅग भरायला घेतली. ते पाहून लहानशा भावाला पुढील कल्पना आली. त्याने ताई, तू जाऊ नको ना.. अशी प्रेमळ व आर्त विनवणी सुरु केली. त्याला न जुमानता ती घरातून निघू लागली. त्यावेळी लहानग्या भावाने असहाय्यपणे मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला.. त्याने आरडाओरडा सुरू करताच संतापलेल्या बहिणीने जवळच पडलेला बत्ता उचलून त्याच्या डोक्यावर प्रहार करणे सुरू केले. बत्त्याच्या माराने त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले व तो खाली कोसळला. रक्ताने माखलेले कपड्यांनिशी तिने घरातून पळ काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून